TRENDING:

Menopause : रजोनिवृत्तीनंतर कर्करोगाचा धोका का वाढतो ? स्त्रियांच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती

Last Updated:

रजोनिवृत्तीनंतर कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. याबद्दल अचूक माहिती असणं महिलांना सतर्क आणि सुरक्षित राहण्यास मदत करू शकतं. रजोनिवृत्तीनंतर कर्करोगाचा धोका का वाढतो समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मासिक पाळी ते रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. रजोनिवृत्ती हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ असतो. तो सहसा 45 ते 55 वयोगटातील असतो. या काळात मासिक पाळी थांबते आणि शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात.
News18
News18
advertisement

रजोनिवृत्तीदरम्यान, हॉट फ्लॅशेस, रात्री घाम येणं, निद्रानाश, मूड स्विंग, थकवा, योनीमार्गात कोरडेपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण यासारख्या समस्या या काळात जाणवतात. रजोनिवृत्तीनंतर कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. याबद्दल अचूक माहिती असणं महिलांना सतर्क आणि सुरक्षित राहण्यास मदत करू शकतं.

रजोनिवृत्तीनंतर कर्करोगाचा धोका का वाढतो समजून घेऊया. रजोनिवृत्तीनंतर, शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. या हार्मोनल बदलांमुळे, विशेषतः स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग अशा कर्करोगांचा धोका वाढू शकतो. याशिवाय, वृद्धत्व हे कर्करोगाचं एक प्रमुख कारण आहे, कारण कालांतरानं शरीराची खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्याची क्षमता कमी होते.

advertisement

Eye Cancer : डोळ्यांनाही असतो कर्करोगाचा धोका, जाणून घ्या लक्षणं, प्रकार, उपचार

स्तनाचा कर्करोग: रजोनिवृत्तीनंतर महिलांमधे हा कर्करोग होण्याचं प्रमाण अधिक आहे. कुटुंबातील कोणाला कर्करोग असेल तर म्हणजेच family history असेल तर तसंच लठ्ठपणा, मद्यपान आणि कमी शारीरिक हालचाली यामुळे धोका वाढू शकतो.

गर्भाशयाचा कर्करोग: रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाचा कर्करोग होण्याचं प्रमाणही जास्त आहे, विशेषतः लठ्ठपणा, मधुमेह किंवा हार्मोनल असंतुलन असलेल्या महिलांमधे हे प्रमाण जास्त असू शकतं.

advertisement

आतड्यांचा कर्करोग: वयानुसार धोका वाढतो, त्यामुळे तपासणी करणं महत्त्वाचं ठरतं. रजोनिवृत्तीनंतर वजन वाढू शकतं. पण जास्त चरबीमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो कारण चरबीच्या ऊती कमी प्रमाणात इस्ट्रोजेन तयार करतात.

जीवनशैलीतले कोणते बदल महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे -

नियमित व्यायाम करणं

हिरव्या भाज्या, फळं आणि संपूर्ण धान्य वापरुन केलेला पोषक आहार

मद्यपान मर्यादित करणं

advertisement

धूम्रपान सोडणं

या सर्व सवयी कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

स्क्रीनिंग आणि लवकर निदान का महत्त्वाचं ?

नियमित तपासणी अनेकदा जीव वाचवू शकते. महिलांनी निश्चितच स्तन तपासणी करून घेतली पाहिजे आणि त्यांच्या वयानुसार आतड्यांचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचीही तपासणी केली पाहिजे. खूप जास्त रक्तस्त्राव, दीर्घकाळ पोट फुगण्याचा त्रास, सतत अपचन, रजोनिवृत्तीनंतर वजन वाढणं किंवा कमी होणं यासारखी लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्या.

advertisement

Power Nap : दुपारच्या डुलकीला पॉवर नॅप का म्हणतात ? डुलकी का महत्त्वाची ?

कुटुंबात कोणाला कर्करोग झाला असेल तर तुम्हाला तो नक्कीच होईल असं नाही. योग्य माहिती, निरोगी जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय सल्ल्यानं तुमचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. काही चिंता असेल किंवा तुमच्या शरीराच्या सिग्नलबद्दल खात्री नसेल, तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

रजोनिवृत्तीनंतर सतर्क राहणे हे भीतीचं नव्हे तर शहाणपणाचे लक्षण आहे. वेळेवर पावलं उचलून, महिला केवळ कर्करोग रोखू शकत नाहीत तर निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन देखील जगू शकतात.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Menopause : रजोनिवृत्तीनंतर कर्करोगाचा धोका का वाढतो ? स्त्रियांच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल