TRENDING:

उत्तर प्रदेशमधील मीरतमधील उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे पंतप्रधानांनी केले सामाईक

Last Updated:

नरेंद्र मोदी यांनी मीरत मेट्रो, दिल्ली-मेरठ नमो भारत परिक्षेत्र, MSME विकास, AI शिखर परिषद, भाजपाचे डबल इंजिन सरकार आणि काँग्रेसच्या राजकारणावर ठळक मुद्दे मांडले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील मीरत येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे सामायिक केले.
News18
News18
advertisement

एक्स या समाज माध्यमांवरून प्रसारित संदेश मालिकेत मोदी म्हणाले,

“भाजपा ने विकासासह आपली धोरणे आणि हेतू यांना प्राधान्य दिले आहे. त्याचे एक मोठे उदाहरण म्हणजे मीरत मेट्रोदेखील आहे, ज्याचा फायदा येथील शेतकऱ्यांसह कारागिरांपर्यंत सर्वांना होणार आहे. गेल्या वर्षी आमच्या सरकारने जे जागतिक सामंजस्य करार केले आहेत, त्यामुळे मीरतसह उत्तर प्रदेशमध्ये एमएसएमईने विकासाला नवी चालना मिळणार आहे.

advertisement

भारतात झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या एआय शिखर परिषदेमुळे देशवासियांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. परंतु, काँग्रेसने या जागतिक कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या घाणेरड्या आणि निलाजऱ्या राजकारणाचा आखाडा करण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत लाजीरवाणा प्रकार आहे.

भाजपाचे डबल इंजिन सरकार उत्तर प्रदेशला देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात कोणतीही कमतरता ठेवणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. उत्तर प्रदेशाचा विकास होईल तेव्हाच विकसित भारत साकारणार आहे. देशातील अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. संपूर्ण दिल्ली- मेरठ नमो भारत परिक्षेत्र राष्ट्राला समर्पित करताना मला अभिमान वाटतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

देशवासियांचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मीरत मेट्रो नेटवर्कमुळे येथील लोकांचे आय़ुष्य अधिक सुलभ होणार आहे. मीरत मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान मुलांशी संवाद झाल्याने हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरला आहे. विकास प्रकल्पांबद्दल मीरतवासियांचा उत्साह आणि उत्सुकता यांनी मला नवी उर्जा मिळवून दिली.”

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
उत्तर प्रदेशमधील मीरतमधील उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे पंतप्रधानांनी केले सामाईक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल