TRENDING:

रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली! पाऊस कमी असला तरी धरणे तुडुंब, 81 टक्के पाणीसाठा!

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी, मे महिन्यातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी समाधानकारक आहे. एकूण...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी, मे महिन्यात जवळपास 15 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी टिकून राहिली आहे. तीन मध्यम प्रकल्पांसह एकूण 57 प्रकल्पांमध्ये 81.14 टक्के पाणीसाठा आहे.
Ratnagiri rain update
Ratnagiri rain update
advertisement

पाणीसाठा जास्त

रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधील नातुवाडी, संगमेश्वरमधील गडनदी आणि राजापूरमधील अजुर्ना हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांसह 54 लघुप्रकल्पांमध्ये मे महिन्यात दुसऱ्या पंधरावड्यात सलग 12 ते 13 दिवस जोरदार पाऊस कोसळला होता. त्यामुळे 43 धरणे फुल्ल भरलेली आहे. यंदा पाऊस कमी पडत असला तरी जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा 81.14 टक्के झाला आहे. मागील वर्षी हा पाणीसाठी 81.21 टक्के होता. पाऊस कमी असूनही त्याचा परिणाम धरणांच्या पाणीसाठ्यावर दिसून आलेला नाही.

advertisement

ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी झाला असला तरी रात्रीच्या वेळेस जोरदार कोसळणाऱ्या सरींमुळे धरणांमधील पाण्याची पातळी राखण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांची पाणी पातळी सध्या तरी टिकून आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने आणखी पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील 57 प्रकल्पांत 368 दशलक्ष घनमीटर जलसाठा

    advertisement

  • जिल्ह्यातील नातुवाडी, गडनदी आणि अजुर्ना या 3 मध्यम प्रकल्पांसह एकूण 57 प्रकल्पांमध्ये सध्या 368 दशलक्ष घनमीटर (81.14 टक्के) जलसाठा आहे. 14 प्रकल्प नादुरुस्त असल्याने तिथे पाणीसाठा केला जात नाही.
  • गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 369.63 दशलक्ष घनमीटर (81.25 टक्के) होता.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी

  • नातुवाडी मध्यम : 18377 दशलक्ष घनमीटर (67.49%)
  • advertisement

  • गडनदी मध्यम : 6223 दशलक्ष घनमीटर (51.17%)
  • अजुर्ना मध्यम : 72.560 दशलक्ष घनमीटर (100%)
  • सर्व प्रकल्पांचा एकत्रित साठा : 368 दशलक्ष घनमीटर (81.14%)

रत्नागिरी शहराची तहान भागवणारे शीळ धरण यंदाही 100 टक्के भरले असून, त्यात 3.3 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जून-सप्टेंबर या चार महिन्यांचा पावसाळा मानला जातो. या कालावधीत जिल्ह्यात साधारण 3364.22 मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.

advertisement

हे ही वाचा : Weather Alert: वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा धो धो सुरू, या 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट

हे ही वाचा : Marathwada Rain: वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यात पावसाचा जोर, 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली! पाऊस कमी असला तरी धरणे तुडुंब, 81 टक्के पाणीसाठा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल