TRENDING:

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीआधी स्वस्त होणार दैनंदिन वापराच्या 'या' वस्तू

Last Updated:

GST : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी प्रणालीत बदल करून दैनंदिन वापराच्या काही महत्त्वाच्या वस्तूंवरील कर कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे या वस्तू स्वस्त दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली अत्यंत सोयीस्कर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसातच साधारण 12 टक्के आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे, मात्र त्याजागी एकच जीएसटी स्लॅब असेल. परंतू आरोग्यास हानिकारकर असलेल्या तंबाखूसारख्या वस्तूवर सरकार 40 टक्के कर बसवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
News18
News18
advertisement

जीएसटी स्लॅबमधील होणार असलेल्या या बदलांमुळे औषधे, खाद्यपदार्थ तसेच नागरिकांच्या दररोजच्या वापरातील वस्तूंवर कर कमी होणार आहेत. आता 5 टक्के, 18 टक्के तसेच 28 टक्के स्लॅबमध्ये असलेल्या विविध वस्तूंवरील कर हे येणाऱ्या जीएसटी प्रणालीमध्ये कमी होतील,यामुळेच मध्यमवर्गीयांना याचा विशेष असा फायदा नक्कीच होणार आहे. विशेष म्हणजे एसी, टीव्ही आणि रेफ्रिजरेटर अशा वस्तूंवरील कर देखील कमी होणार असण्याची शक्यता आहे.

advertisement

'गुड अँड सिम्पल टॅक्स' हवाच

देशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये सुधारणांची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने यावर प्रतिक्रियाही दिली आणि त्यात म्हटलं की, जीएसटी हा 'ग्रोथ सप्रेसिंग टॅक्स' झाला असून तो परत एकदा 'गुड अँड सिम्पल टॅक्स' झाला पाहिजे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सरकारला जीएसटी 2.0 वर लवकरच एक चर्चापत्र जाहीर करण्याचीही मागणी केलेली आहे. यामुळे जीएसटी स्लॅबची संख्या कमी करणे शिवाय राज्यांचा महसूल सुरक्षित ठेवणे आणि देशातील छोट्या उद्योगांच्या सर्व समस्या सोडवण्यावर चर्चा होईल,असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.

advertisement

12 टक्के जीएसटीमधील असलेल्या वस्तू कोणत्या?

12% टक्के जीएसटी साधारण जाम विविध फळांचे सर आणि फळे,भाज्यांचे रस ,पॅकेटबंद नारळ पाणी, नमकीन शिवाय अनेक वैद्यकीय वस्तू, औषधे.औषधे, वैद्यकीय व सर्जिकल वस्तू, ग्लुकोमीटर, कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मे, लेन्स, वह्या, पेन्सिल्स, भूमितीय बॉक्स, स्प्रिंकलर्स, श्रेशिंग मशीन, कंपोस्टिंग मशीन सायकल्स, ट्रायसिकल.

28 टक्के जीएसटीमधील असलेल्या वस्तू कोणत्या?

advertisement

28% जीएसटी लागणाऱ्या वस्तूंमध्ये एसी, डिशवॉशर, ऑटोमोबाईल्स, सिमेंट आणि काही प्रकारचे टीव्ही सेट यांचा समावेश होतो

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर तरुणाने नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, आज आहे 45 कॅफेचा मालक
सर्व पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जाहीर केले की, जीएसटी प्रणालीत महत्त्वाच्या सुधारणा केल्या जाणार आहेत. त्यांनी सांगितले की, या सुधारणा करण्यासाठी विविध राज्यांशी चर्चा झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त मिळणार असून हा बदल नागरिकांसाठी दिवाळीचा खास भेटवस्तूसारखा ठरेल. याशिवाय, या सुधारणांचा फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) मोठ्या प्रमाणात होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/राज्य/
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीआधी स्वस्त होणार दैनंदिन वापराच्या 'या' वस्तू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल