TRENDING:

Farmer Success: अर्धा एकर शेती, 90 दिवसांत लखपती, अकरावीच्या विद्यार्थ्याची कमाल, काय केलं?

Last Updated:
Farmer Success: अवघ्या 90 दिवसांत बक्कळ कमाई झाली आहे. त्यामुळे या युवा शेतकऱ्याचा उत्साह वाढला आहे.
advertisement
1/5
Farmer Success: अर्धा एकर शेती, 90 दिवसांत लखपती, अकरावीच्या विद्यार्थ्याची कमाल, काय केलं?
सोलापूर जिल्ह्यात अनेक तरुण प्रयोगशील शेतीकडे वळत असून चांगले उत्पन्नही घेत आहेत. माढा तालुक्यातील मोडनिंबच्या युवा शेतकऱ्यानं तर कमालच केली आहे. अवघ्या 90 दिवसांत दीड लाखांचं उत्पन्न घेतलं आहे.
advertisement
2/5
नंदकिशोर सूर्वे हा अकरावीत शिकणारा तरुण आहे. त्याने आपल्या अर्धा एकर शेतात भोपळ्याची लागवड केली आहे. यातून अवघ्या 90 दिवसांत बक्कळ कमाई झाली आहे. त्यामुळे या युवा शेतकऱ्याचा उत्साह वाढला आहे.
advertisement
3/5
परंपरागत घरची शेती आणि या क्षेत्रात आवड असल्याने नंदकिशोरने शिक्षण घेत अर्ध्या एकरात भोपळ्याची लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून रानभाजली, शेणखत टाकून बेड तयार केले.
advertisement
4/5
नंदकिशोरने याच शेतात आधी टोमॅटोचे पीक घेतले होते. भुरी, केवडा व फळकुज रोखण्यासाठी वेळोवेळी फवारणी केली. एकूण 30 हजारांचा खर्च आला असला तरी योग्य नियोजन व मेहनतीमुळे 1.50 लाखांचा नफा मिळाला.
advertisement
5/5
सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत कॉलेजला जाणाऱ्या नंदकिशोरकडून उरलेल्या वेळात शेतीची काळजी घेतली जाते. भोपळा सोलापूर बाजाराऐवजी पुण्यात विकला जातो, जेथे सध्या 15 ते 30 रुपये किलो दर मिळतो. “नोकरीसाठी धावण्यापेक्षा शिक्षणासोबतच शेती किंवा व्यवसायाकडे वळा, तर नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते,” असं नंदकिशोर सांगतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success: अर्धा एकर शेती, 90 दिवसांत लखपती, अकरावीच्या विद्यार्थ्याची कमाल, काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल