Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, 8 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आता 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या काही काळात राज्यात अवकाळी पावसानं धुमशान घातलं होतं. आता हवापालट झाल्याचे चित्र असून 6 एप्रिल रोजी 8 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण ते विदर्भ विभागानुसार हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकण विभागातही पावसाचा कोणताही इशारा नसून हवामान कोरडे राहील. किनारी भागात आर्द्रता अधिक राहू शकते. येथे किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार असले तरी सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या विभागात किमान तापमान सुमारे 22 ते 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस राहू शकते, त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात सर्वसाधारणपणे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे या भागात हवामानात अचानक बदल होऊ शकतो.
advertisement
6/7
संपूर्ण विदर्भात सोमवारी वादळी पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावतीसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
advertisement
7/7
एकूणच, विदर्भात येलो अलर्टमुळे सतर्कता आवश्यक असून इतर भागांमध्ये कोरडे हवामान राहणार आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये तुरळक वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, 8 जिल्ह्यांना अलर्ट