TRENDING:

WiFi Router : घराच्या कोपऱ्यात वाय-फाय चालत नाही? नवा राउटर घेण्यापूर्वी 'या' 3 गोष्टी तपासा, मिळेल सुपरफास्ट स्पीड

Last Updated:
तुम्हाला माहितीय का की प्रॉब्लेम तुमच्या इंटरनेट प्लॅनमध्ये नाही, तर तुमच्या 'वाय-फाय राउटर'मध्ये असू शकतो. जर तुमचं घर मोठं असेल किंवा भिंती जाड असतील, तर साधा राउटर पुरत नाही. त्यामुळे अशावेळी तुम्हाला नवीन राउटर विकत घेण्याची गरज आहे. नवा राउटर खरेदी करताना फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचेल.
advertisement
1/8
WiFi Router : घराच्या कोपऱ्यात वाय-फाय चालत नाही? नवा राउटर घेण्यापूर्वी 'या' 3 गोष्टी तपासा, मिळेल सुपरफास्ट स्पीड
आजच्या काळात आपल्या घराचा पत्ता बदलला तरी चालेल, पण घराचा 'वाय-फाय पासवर्ड' चुकता कामा नये, इतकं इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलंय. त्यामुळे हल्ली घराघरात वायफाय लावलेला असतोच. लोक नवीन ठिकाणी रहायला गेली तरी देखील तिथे ते सर्वात आधी कोणती गोष्ट करुन घेत असली तर ती आहे वायफाय कनेक्शन. लोकांना हल्ली सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि अलेक्सासारखी उपकरणं वापरण्याची सवय झाली आहे, ज्यासाठी इंटरनेट लागतंच. पण अनेकदा असं होतं की, हॉलमध्ये वाय-फायचा स्पीड एकदम चांगला असतो, मात्र बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये गेल्यावर सिग्नल गायब होतो किंवा कमी रेंज मिळते. मग आपण चिडून कस्टमर केअरला फोन लावतो किंवा इंटरनेट प्लॅन बदलतो.
advertisement
2/8
पण तुम्हाला माहितीय का की प्रॉब्लेम तुमच्या इंटरनेट प्लॅनमध्ये नाही, तर तुमच्या 'वाय-फाय राउटर'मध्ये असू शकतो. जर तुमचं घर मोठं असेल किंवा भिंती जाड असतील, तर साधा राउटर पुरत नाही. त्यामुळे अशावेळी तुम्हाला नवीन राउटर विकत घेण्याची गरज आहे. नवा राउटर खरेदी करताना फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचेल.
advertisement
3/8
1. घराचा आकार आणि कव्हरेज: मेश वाय-फाय की साधा राउटर?राउटर घेताना सगळ्यात आधी विचार करा की तुमचं घर किती मोठं आहे? जर घर छोटे असेल म्हणजे 800-1200 चौ. फूट तर यासाठी 1500-2000 चौ. फूट कव्हरेज देणारा कोणताही चांगला सिंगल राउटर पुरेसा आहे.
advertisement
4/8
मोठे घर किंवा दोन मजले (1500 चौ. फुटांपेक्षा जास्त): अशा वेळी साधा राउटर कामाला येत नाही. इथे एन्ट्री होते 'मेश वाय-फाय सिस्टम'ची (Mesh Wi-Fi). यामध्ये एक मुख्य राउटर आणि 2-3 छोटे नोड्स असतात, जे पूर्ण घरात समान सिग्नल पसरवतात. यामुळे 'डेड झोन' (जिथे इंटरनेट चालत नाही असा कोपरा) पूर्णपणे संपतो. TP-Link Deco किंवा Google Nest हे याचे उत्तम पर्याय आहेत.
advertisement
5/8
2. सिंगल, ड्युअल की ट्राय-बँड? स्पीडचा खरा खेळ इथेच आहेजुन्या काळातले राउटर फक्त एकाच रस्त्यावरून डेटा पाठवायचे, त्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायचं. आता तंत्रज्ञान बदललंय.ड्युअल बँड : यात 2.4 GHz आणि 5 GHz असे दोन मार्ग असतात. 5 GHz वर स्पीड जबरदस्त मिळतो, तर 2.4 GHz चे सिग्नल लांबपर्यंत पोहोचतात. जर तुमच्याकडे 100-300 Mbps चा प्लॅन असेल, तर ड्युअल बँडच निवडा.ट्राय-बँड : घरात 10-20 पेक्षा जास्त डिव्हाइसेस असतील, तर ट्राय-बँड राउटर घ्या. यामुळे कितीही लोक कनेक्ट झाले तरी स्पीड कमी होत नाही.
advertisement
6/8
प्रो-टिप: शक्य असल्यास Wi-Fi 6 (802.11ax) तंत्रज्ञान असलेला राउटर घ्या. हा नवीन प्रकारचा राउटर आहे जो बॅटरी कमी खातो आणि एकाच वेळी अनेक उपकरणांना वेगवान इंटरनेट देतो.
advertisement
7/8
3. बजेट आणि तुमच्या गरजातुमच्या खिशाला परवडेल असा आणि गरजा पूर्ण करणारा राउटर निवडा5000 रुपयांपर्यंत: मध्यम आकाराच्या घरांसाठी TP-Link Archer C80 किंवा Xiaomi Mi Router 4A हे चांगले पर्याय आहेत.8000 ते 15,000 रुपये: मोठ्या कव्हरेजसाठी TP-Link Archer AX सिरीज (Wi-Fi 6) किंवा Netgear चे राउटर उत्तम आहेत.15,000 पेक्षा जास्त: जर तुम्हाला प्रीमियम अनुभव हवा असेल आणि घर खूप मोठं असेल, तर मेश वाय-फाय सिस्टम हाच सर्वोत्तम गुंतवणूक आहे.
advertisement
8/8
इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी काही खास देसी जुगाड:1. मध्यभागी ठेवा: राउटर कधीही कोपऱ्यात किंवा कपाटात लपवून ठेवू नका. त्याला घराच्या मध्यभागी आणि थोड्या उंचावर ठेवा.2. अँटेना सेट करा: जर तुमच्या राउटरला 4 किंवा 6 अँटेना असतील, तर काही सरळ आणि काही आडवे ठेवा. यामुळे सिग्नल सर्व दिशांना व्यवस्थित पसरतात.3. स्मार्ट वापर: टीव्ही किंवा प्रिंटरला 2.4 GHz बँडवर कनेक्ट करा आणि गेमिंग किंवा लॅपटॉपसाठी 5 GHz चा वापर करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WiFi Router : घराच्या कोपऱ्यात वाय-फाय चालत नाही? नवा राउटर घेण्यापूर्वी 'या' 3 गोष्टी तपासा, मिळेल सुपरफास्ट स्पीड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल