TRENDING:

कोणता फॅन जास्त हवा देतो, 3 Blade की 4 Blade? एकदा अवश्य घ्या जाणून

Last Updated:
उन्हाळ्यात घरात पंखा हा असावाच लागतो. अनेक लोक उन्हाळ्यात पंखा खरेदी करण्याचा प्लॅन करतात. पण किती ब्लेडचा पंखा जास्त हवा देतो? चला जाणून घेऊया.
advertisement
1/9
कोणता फॅन जास्त हवा देतो, 3 Blade की 4 Blade? एकदा अवश्य घ्या जाणून
भारतामध्ये प्रत्येक घरात कोणतंही उपकरणं असो किंवा नसो पंखा हा असतोच. आपण विशेषतः 3 ब्लेड असणारा पंखा वापरतो. कारण बाजारात तो सर्वात जास्त पहायला मिळतो. एवढंच नाही तर आपण एक ब्लेडचा पंखा पाहिला तर आपल्याला वाटतं की, त्याने हवा येणार नाही. तसंच 4 ब्लेडचा पंखा पाहून आपल्याला वाटतं की, तो जास्त वीज वापरत असेल. आपल्या मनात असे विविध प्रश्न निर्माण होत असतात. यामुळेच आज आपण जाणून घेऊया की, किती ब्लेडचा पंखा सर्वात बेस्ट असतो.
advertisement
2/9
एक ब्लेडचा फॅन : फॅन घ्यायचं म्हटलं तर त्याचे ब्लेड, डिझाइन, मोटर आणि त्यातून निघणाऱ्या हवेच्या एयरफ्लोसारख्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. सामान्यतः एक ब्लेडचे पंखे पाहायला मिळत नाहीत. मात्र याची एक खासियत आहे. हे हवा विशेषतः एकाच दिशेला किंवा स्थानावर केंद्रित करून पाठवतात. यामुळेच याचा वापर हा औद्योगित किंवा व्यावसायिक उद्देशासाठी केला जातो.
advertisement
3/9
दोन ब्लेडचा पंखा : काही घरांमध्ये दोन ब्लेड असणाऱ्या पंख्याचा वापर केला जातो. आता हे जास्त हवा देतात का, तर नाही. हे फॅन सामान्यतः लहान खोल्यांसाठी वापरले जातात. हे कमी प्रमाणात मीडियम हवा देतात. यामुळे लहान खोल्यांसाठी ते बेस्ट मानले जातात.
advertisement
4/9
तीन ब्लेडचे फॅन : तीन ब्लेड असणारे फॅन घरात वापरासाठी सर्वात योग्य मानले जातात. हे जास्तीत जास्त घरात सहज दिसतात. तीन ब्लेड असणारे पंखे हे चारही बाजूला समान हवा प्रदान करतात. सोबतच याचा वीज वापरही कमी असतो. यामुळेच ते घरात खुप लोकप्रिय आहेत. हे पंखे मीडियम आकाराच्या रुमसाठी बेस्ट असतात.
advertisement
5/9
चार ब्लेड असणारे फॅन : चार ब्लेड असणाऱ्या पंख्याचा वापर सध्याच्या काळात वाढला आहे. हे जास्त हवा देतात, यामुळे मोठ्या खोल्यांसाठी खुप उपयुक्त ठरतात. खरंतर याच्यासोबतच याचा वीज खर्चही वाढतो. चारपेक्षा जास्त ब्लेड असणारे पंखे सामान्य घरांमध्ये वापरले जात नाहीत. पण चारपेक्षा जास्त ब्लेड असणारा पंखा खरेदी करायचा असेल तर काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं.
advertisement
6/9
आपल्याला किती गरज आहे हे पाहून आपण पंख्याचा वापर करायला हवा. अनेक लोक विचार करतात की, मोठ्या ब्लेडचे पंखे जास्त वीज खर्च करतात आणि लहान ब्लेडचे पंखे कमी वीज खर्च करतात. काही अर्थी ही गोष्ट खरी आहे. पण ते किती वीज खर्च करणार हे सर्व फॅनच्या मोटरवर अवलंबून असते.
advertisement
7/9
आणखी एक लक्ष देणारी गोष्ट आहे की, पंख्याच्या ब्लेडचं टोक थोडं वक्र असावं. असं नसेल तर हवा योग्य पद्धतीने खाली येणार नाही. यामुळे पंख्याच्या ब्लेडला नुकसान होण्यापासून बचाव व्हायला हवा. पण त्याच्या योग्य कर्व्ह बिघडवू नका.
advertisement
8/9
लहान मोटर आणि कमी RPM (प्रति मिनिट फिरण्याची क्षमता) चे पंखे कमी वीज वापरतात. तसंच जास्त एयरफ्लो देणारे पंखे खोलीला लवकर गार करतात. खोली लवकर गार होते. तेव्हा पंख्याचा वापर कमी करुन आपण वीज बचतही करू शकतो.
advertisement
9/9
कोणताही पंखा खरेदी करताना एनर्जी स्टार रेटिंग अवश्य चेक करा. नेहमी जास्त रेटिंगचे पंखे खरेदी करा. किमान 3-स्टार पंखा घेणं चांगली गोष्ट मानली जाते. 4-स्टार पंखा आणखी चांगला असतो. 5-स्टार पंखे मिळणं थोडं कठीण असतं. खरंतर काही लोक जास्त हवेसाठी जास्त वीज खर्च होण्याचा विचार करत नाहीत. अशावेळी ते 5-6 ब्लेडचे पंखे वापरतात. पण यासाठी मोठी खोली असणे गरजेचे आहे. अन्यथा हे योग्य पद्धतीने काम करणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
कोणता फॅन जास्त हवा देतो, 3 Blade की 4 Blade? एकदा अवश्य घ्या जाणून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल