TRENDING:

1564 कोटींची कमाई, तरीही Dhurandhar 2 फुस्स... मोडू शकला नाही आमिर खानचा रेकॉर्ड, तब्बल इतक्या कोटींचा फरक

Last Updated:
Dhurandhar 2 Collection: इतकी अवाढव्य कमाई करूनही 'धुरंधर २' अजून बराच मागे आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्म्सच्या यादीत 'धुरंधर २' सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
advertisement
1/8
1564 कोटींची कमाई, तरीही Dhurandhar 2 फुस्स... मोडू शकला नाही आमिर खानचा रेकॉर्ड
'धुरंधर' या सिनेमाने ते करून दाखवलंय, जे कित्येक वर्षांमध्ये बॉलिवूडलाही जमलं नव्हतं. गेली बरीच वर्षे बॉक्स ऑफिसवर साऊथच्या सिनेमांचा बोलबाला दिसतोय.
advertisement
2/8
त्या फिल्मचे विषय आणि त्यांची भव्यता प्रेक्षकांना भुरळ पाडत होती. मात्र, 'धुरंधर'ने प्रेक्षकांना बॉलिवूड फिल्मसाठी पुन्हा एकदा थिएटरकडे वळवलं.
advertisement
3/8
सध्या संपूर्ण देशात आणि सोशल मीडियावर फक्त 'धुरंधर: द रिव्हेंज' चा डंका वाजतोय. अवघ्या १८ दिवसांत या फिल्मने अवघ्या १,५६४ कोटींची कमाई केली आहे.
advertisement
4/8
मात्र, इतकी अवाढव्य कमाई करूनही 'धुरंधर २' अजून बराच मागे आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्म्सच्या यादीत 'धुरंधर २' सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
advertisement
5/8
तिसऱ्या आठवड्यातही थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत असून, रणवीर सिंगचा हा चित्रपट आता भारतीय सिनेमाच्या इतिहासातील टॉप ३ फिल्म्समध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
6/8
फिल्म रिलीज होऊन इतके दिवस उलटले असले, तरीही प्रेक्षकांची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मात्र, 'धुरंधर २' ला अद्याप प्रभासच्या बाहुबलीचा रेकॉर्ड मोडता आलेला नाही. १,५६४ कोटींची कमाई करूनही 'धुरंधर २' अजून सर्वाधिक कमाई करणाऱ्या फिल्म्सच्या यादीत बराच मागे आहे.
advertisement
7/8
या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे १७०० कोटींहून अधिक कमाई करणारा अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २', दुसऱ्या स्थानावर आहे १,८१० कोटींची कमाई केलेला प्रभासचा 'बाहुबली २' आणि पहिल्या स्थानावर आहे २,२०० कोटींची कमाई केलेला बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल'.
advertisement
8/8
'पुष्पा २' ला मागे टाकण्यासाठी 'धुरंधर २' ला आता फक्त काही कोटींचं अंतर पार करायचं आहे. ज्या वेगाने रणवीरचा हा स्पाय थ्रिलर कमाई करतोय, ते पाहता लवकरच तो 'बाहुबली २' लाही तगडी टक्कर देईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
1564 कोटींची कमाई, तरीही Dhurandhar 2 फुस्स... मोडू शकला नाही आमिर खानचा रेकॉर्ड, तब्बल इतक्या कोटींचा फरक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल