TRENDING:

तुम्ही तिथपर्यंत जा...! अशोक खरात प्रकरणात 'मराठमोळी' अभिनेत्रीही अडकली वादात; महिलांना दिला होता सल्ला

Last Updated:
Actress on Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये काम केलेल्या या मराठी अभिनेत्रीने आपलं मत मांडलं. तेव्हा ती असं काही बोलून गेली की आता तिला ट्रोल केलं जात आहे.
advertisement
1/9
तुम्ही तिथपर्यंत जा...! अशोक खरात प्रकरणात 'मराठमोळी' अभिनेत्रीही अडकली वादात; महिलांना दिला होता सल्ला
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात आता बॉलिवूडमध्ये काम केलेली मराठी कुटुंबातील अभिनेत्रीही वादात अडकली आहे. जिने खरात प्रकरणात महिलांना सल्ला दिला होता.
advertisement
2/9
ही अभिनेत्री आहे ममता कुलकर्णी. एका मुलाखतीत ममता म्हणाली, "आपण मराठी आहोत. स्त्रियांमध्ये एक थर्ड व्हिजन असतं. त्यांना आतून कळतं की समोरचा माणूस कसा आहे, कसं बघतोय. त्याला पाहताच तो खोटा आहे हे समजायला हवं होतं."
advertisement
3/9
"तुम्हाला वाटलं की तुम्ही निर्बल आहात तर तुम्ही त्याला फटके मारून तिथून बाहेर पडायला हवं होतं. त्यानंतर केस करायला हवी होती. पन्नास बायको वाचल्या असत्या" असंही ममता कुलकर्णी म्हणाली.
advertisement
4/9
"आपल्या घरात मुलींची लग्न असतात, पत्रिका दाखवायची असेल तर तिथपर्यंत जा. पण तुम्ही थेट त्या व्यक्तीच्या बेडरूममध्ये कसे जाता?" असा सवालही तिने उपस्थित केला.
advertisement
5/9
खरात प्रकरणात ममता कुलकर्णीने एबीपीला दिलेल्या मुलाखतीत मांडलेलं हे आपलं मत आता तिला चांगलंच भोवताना दिसत आहेत. आता ती वादात सापडली आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल करत आहेत. काहींनी तिचा ड्रग्ज तस्करीचा मुद्दाही उकरून काढला आहे.
advertisement
6/9
ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात परतली आणि त्यानंतर ती थेट कुंभमेळ्यात पोहोचली.  किन्नर आखाड्याची ती महामंडलेश्वर बनली. तिनं तिचं नाव बदलून ममता नंद गिरी असं केलं. पण काही महिन्यातच ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला.
advertisement
7/9
महामंडलेश्वर पदाचा नाजीनामा दिल्यानंतर ममता कुलकर्णी पुन्हा आपल्या कार्यक्षेत्रात परतली आहे. काही दिवसांआधी ती रिएलिटी शोमध्ये झळकली होती. येत्या काळात ती बॉलिवूड सिनेमात दिसणार असल्याच्याही चर्चा आहेत.
advertisement
8/9
अशोक खरात प्रकरणाबाबत सांगायचं तर नाशिकमधील हा भोंदूबाबा ज्याने महिलांच्या लैंगिक शोषणासह लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. 
advertisement
9/9
सामान्य लोकांपासून ते बड्या राजकीय नेते अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. आता, या अशोक खरातचे  आणखी वेगवेगळे कारनामेही समोर येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तुम्ही तिथपर्यंत जा...! अशोक खरात प्रकरणात 'मराठमोळी' अभिनेत्रीही अडकली वादात; महिलांना दिला होता सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल