TRENDING:

Skin Care Tips : घरी सहज बनवा 'व्हिटॅमिन सी' सीरम! चेहऱ्यावरची चमक पाहून, सगळे विचारतील सिक्रेट

Last Updated:
बाजारात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन सी सीरम सहज उपलब्ध असतात. परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरी देखील अगदी सहज नैसर्गिक पद्धतीने हिटॅमिन सी सीरम बनवू शकता.
advertisement
1/9
घरी सहज बनवा 'व्हिटॅमिन सी' सीरम! चेहऱ्यावरची चमक पाहून, सगळे विचारतील सिक्रेट..
आजकाल स्कीन केअर ही काळाची गरज बनली आहे. धूळ आणि प्रदुषणामुळे त्वचा कोरडी होते, तसेच अनियमित जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर डाग, मुरूम आणि डार्क सर्कल दिसू लागतात. त्यामुळे वेळीच काळजी घेतली तर या समस्या टाळता येतात.
advertisement
2/9
तसेच योग्य प्रकारे घरगुती उपचार करून देखील चेहऱ्यावर डाग घालवून चमक परत आणता येते. यात हिटॅमिन सी सीरम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी हिटॅमिन सी सीरम अतिशय महत्त्वाचे असते.
advertisement
3/9
हिटॅमिन सी सीरम चेहऱ्यावरील डाग कमी करते, तसेच त्वचा चमकदार आणि टवटवीत बनवण्यासाठी प्रभावीपणे काम करते. बाजारात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन सी सीरम सहज उपलब्ध असतात. परंतु ते खूप महाग असतात. त्यामुळे ते वापरण प्रत्येकाला शक्य होत नाही. परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरी देखील अगदी सहज नैसर्गिक पद्धतीने हिटॅमिन सी सीरम बनवू शकता.
advertisement
4/9
व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी तुम्हाला 1 छोटा चमचा संत्र्याची पावडर, 2 मोठे चमचे गुलाबजल, 2 छोटे चमचे कोरफडीचा गर किंवा ॲलोव्हेरा जेल, अर्धा कप उकळलेलं पाणी आणि सीरम सूर्यप्रकाशापासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक गडद काचेची बाटली या वस्तू तयार ठेवाव्या लागतील.
advertisement
5/9
व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी तुमच्याकडे संत्र्याची पावडर हवी. तुम्ही बाजारातून संत्र्याची पावडर विकत घेऊ शकता किंवा ती घरी सहज बनवू शकता. संत्र्याची पावडर बनवण्यासाठी दोन संत्र्यांची साली उन्हात पूर्णपणे वाळवा आणि त्यानतंर त्या मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून पावडर तयार करा.
advertisement
6/9
आता घरीच व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात संत्र्याची पावडर घ्या. आता त्यात 2 छोटे चमचे गुलाबजल आणि 2 छोटे चमचे कोरफडीचा गर घाला. ते दोन्ही व्यवस्थित मिसळा. आता त्यात उकळून थंड केलेले पाणी घाला. मात्र, त्याचं प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्या.
advertisement
7/9
आता हे सीरम एका हवाबंद बाटलीत भरा आणि फ्रिजमध्ये ठेवा. तुमचं रसायनमुक्त व्हिटॅमिन सी सीरम तयार आहे. ते वापरण्यासाठी तुमचा चेहरा आधी साध्या पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवा. यानंतर चेहऱ्यावर हळुवार तुम्ही बनवलेले व्हिटॅमिन सी सीरम लावा. तुम्ही हे सीरम 7 ते 10 दिवस वापरू शकता.
advertisement
8/9
व्हिटॅमिन सी सीरम चेहऱ्यावर वापरताना तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर व्हिटॅमिन सी सीरम तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हळुवारपणे लावा. ते लावल्यानंतर दिवसभरात मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे घरगुती सीरम पूर्णपणे सुरक्षित असले तरी पहिल्यांदा ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. हे सीरम तुमची त्वचा चमकदार, निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करेल.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care Tips : घरी सहज बनवा 'व्हिटॅमिन सी' सीरम! चेहऱ्यावरची चमक पाहून, सगळे विचारतील सिक्रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल