TRENDING:

Summer Trip : उन्हाळ्यात गुलमर्गला जायचा प्लॅन करताय? 'ही' सिक्रेट ठिकाणं नक्की पाहा, वाढेल ट्रीपची मजा

Last Updated:
Best places visit in gulmarg : तुम्ही जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी काही बेस्ट ठिकाणं आहेत.
advertisement
1/9
उन्हाळ्यात गुलमर्गला जायचा प्लॅन करताय? 'ही' सिक्रेट ठिकाणं नक्की पाहा, वाढेल ट्रीपची मजा
उन्हाळ्यात बरेच लोक बर्फाच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन बनवतात. काश्मीर गुलमर्ग हे सर्वांचं आवडतं ठिकाण आहे. याठिकाणी फिरायला जाताना बऱ्याचदा लोकांना काही प्रसिद्ध ठिकाणच माहिती असतात. पण काही अशी ठिकाणं आहेत, जी या ठिकाणी गेल्यावर पाहायलाच हवी.
advertisement
2/9
तुम्ही जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी काही बेस्ट ठिकाणं आहेत. काश्मीरला 'पृथ्वीवरील स्वर्ग' म्हणतात आणि गुलमर्ग हे त्याच्या सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे. इथले बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार बर्फाळ मैदानं आणि थंडगार दऱ्या प्रत्येक पर्यटकाला मोहित करतात.
advertisement
3/9
गुलमर्गचं वैशिष्ठ्य म्हणजे हे ठिकाण प्रत्येक ऋतूत एक वेगळंच रूप दिसतं. हिवाळ्यात पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर आणि उन्हाळ्यात हिरव्यागार दऱ्यांची पायघडी. गुलमर्गला भेट देताना आणखी काही खास ठिकाणं आहेत जी तुम्ही पाहायला हवी.
advertisement
4/9
गुलमर्गला जाताना खिलनमर्ग दरीला नक्की भेट द्या. ही या प्रदेशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानली जाते. ही दरी गुलमर्गपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे ट्रेकिंग किंवा घोड्यावरून प्रवास करून पोहोचता येते. खिलनमर्गवरून तुम्हाला नंगा परबत आणि कुन यांसारख्या उंच शिखरांचे विहंगम दृश्य दिसते. इथल्या उतारांवर चालणं आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद, तुमची सहल अविस्मरणीय बनवेल.
advertisement
5/9
अल्पथर तलाव हे गुलमर्गमधील एक अतिशय खास आणि शांत ठिकाण आहे. अफारवत टेकड्यांमध्ये सुमारे 4,390 मीटर उंचीवर वसलेलं हे तलाव वर्षातील बहुतेक काळ गोठलेलं असतं. इथलं दृश्य इतकं मनमोहक आहे की प्रत्येकाला ते कॅमेऱ्यात कैद करावंसं वाटतं. आजूबाजूची बर्फाच्छादित शिखरं आणि निरभ्र निळं आकाश या ठिकाणाचं सौंदर्य आणखी वाढवतात.
advertisement
6/9
गुलमर्गमधील महाराणी मंदिराला धार्मिक श्रद्धा असणाऱ्यांसाठी विशेष महत्त्व आहे. हे मंदिर भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे. ते मोहिनेश्वर शिवालय म्हणूनही ओळखलं जातं. एका लहान टेकडीवर वसलेलं हे मंदिर संपूर्ण गुलमर्गमधून दिसतं. इथं गेल्याने केवळ भक्तीची भावनाच निर्माण होत नाही, तर आजूबाजूची सुंदर दृश्यही मनाला शांत करतात.
advertisement
7/9
तुम्ही साहसी खेळांचे शौकीन असाल, तर गुलमर्ग तुम्हाला निराश करणार नाही. इथली प्रसिद्ध गोंडोला राईड ही जगातील सर्वात उंच केबल कार राईडपैकी एक मानली जाते. या सफरीतून उंचीवरून संपूर्ण दरीची चित्तथरारक दृश्ये दिसतात.
advertisement
8/9
याव्यतिरिक्त स्कीइंग आणि आइस स्केटिंगसारखे हिवाळी खेळही खूप लोकप्रिय आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या खेळांसाठी जास्त पैशांची आवश्यकता नसते, ज्यामुळे ते सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी सहज उपलब्ध होतात.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Trip : उन्हाळ्यात गुलमर्गला जायचा प्लॅन करताय? 'ही' सिक्रेट ठिकाणं नक्की पाहा, वाढेल ट्रीपची मजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल