TRENDING:

Stress And Digestion : सतत चिंता आणि तणावात असता? तुमच्या पचनावर होतोय परिणाम! तज्ज्ञांनी सांगितले उपाय

Last Updated:
Stress And Digestive Health : पचनसंस्थेचं आरोग्य केवळ आपण खात असलेल्या अन्नावरच अवलंबून असे असे नाही, त्यावर मेंदूतील विचारांचा देखील प्रचंड प्रभाव असतो.
advertisement
1/9
सतत चिंता आणि तणावात असता? तुमच्या पचनावर होतोय परिणाम! तज्ज्ञांनी सांगितले उपाय
निरोगी पचनसंस्था असेल तर शरीर निरोगी राहते. त्यामुळं पचनसंस्था निरोगी ठेवणं अतिशय गरजेचं असतं. पचनसंस्थेचं आरोग्य केवळ आपण खात असलेल्या अन्नावरच अवलंबून असे असे नाही, त्यावर मेंदूतील विचारांचा देखील प्रचंड प्रभाव असतो. तुम्हाला सतत तणाव, चिंता आणि अतिताण जाणवत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आतड्यांवरही होऊ शकतो.
advertisement
2/9
चिंता आणि तणाव यामुळं भूक न लागणं, पोट फुगणं, आम्लपित्त किंवा अपचन अशा समस्या उद्भवू शकतात. विज्ञानाने तर हे सिद्ध केलंच आहे, परंतु आयुर्वेदाने देखील हजारो वर्षांपासून हा संबंध ओळखला आहे. आयुर्वेदानुसार पचनक्रिया हा आरोग्याचा पाया असून ती कमकुवत झाल्यास संपूर्ण शरीर कमकुवत होऊ शकतं.
advertisement
3/9
आरोग्य तज्ञ मेंदू आणि आतड्यांमधील या संबंधाला 'गट-ब्रेन ॲक्सिस' असं म्हणतात. द हेल्थ साईट डॉट कॉममध्ये होलिस्टिक लाईफ कोच रिचा अग्रवाल यांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितले की, "आतडे आणि मेंदू एकमेकांना सतत संकेत पाठवत आणि स्वीकारत असतात. संवादाची ही पद्धत व्हेगस नर्व्ह, हार्मोन सिग्नलिंग मार्ग आणि आपल्या आतड्यातील मायक्रोबायोमद्वारे होते. या प्रणालींमध्ये व्यत्यय आल्यास पचनाचे विकार, चिंता आणि नैराश्य अशा मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात."
advertisement
4/9
रिचा अग्रवाल यांनी हे देखील सांगितले की, आतड्यातील सूक्ष्मजीव या संवादात महत्त्वाची भूमिका बजावतात. आतड्यातील सूक्ष्मजीव हे सेरोटोनिन आणि गाबा यांसारख्या अनेक न्यूरोअॅक्टिव्ह पदार्थांचे उत्पादक असतात आणि ते मनःस्थिती, आशा आणि भावनिक आरोग्याचे नियमन करण्याचे काम करतात. आतड्यातील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडल्यास त्याचा भावनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळेच दीर्घकालीन तणावाचा अनेकदा पचनावर परिणाम होतो.
advertisement
5/9
'नेचर मेंटल हेल्थ'मध्ये 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असेही दिसून आले आहे की, आपला मेंदू आणि पोट यांच्यातील असामान्य संवादाचा वाढलेली चिंता, थकवा आणि भावनिक तणावाशी संबंध असतो. आपलं शरीर हे भावनिक तणाव आणि अन्न पचनावर परिणाम करणारा तणाव यांच्यात फरक करू शकत नाही. त्यामुळं चिंता किंवा तणाव वाढला तर पचनसंस्थेवर त्वरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळेच अनेकदा तणाव वाढल्यानंतर आम्लपित्त, पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवतात.
advertisement
6/9
तणावामुळे होणारी पोटफुगी आणि आम्लपित्त कमी करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपायाचा आधार घेऊ शकता. नियमित वेळी जेवा, यामुळे पचनसंस्थेची नैसर्गिक लय स्थापित होते. गरम आणि सहज पचणारे पदार्थ खा, यामुळं पाचक अग्नीला आधार मिळतो आणि अन्न चांगले पचन होते.
advertisement
7/9
याशिवाय जेवताना तुमच्या ताटाकडे पूर्ण लक्ष ठेवा. यामुळे तुमचे शरीर पचनसंस्थेकडे पाठवत असलेले तणावाचे संकेत देखील कमी करते. याशिवाय तुम्ही श्वासोच्छ्वास व्यायाम आणि ध्यान केल्याने मज्जासंस्था शांत होते आणि आतडे-मेंदू संवादातील महत्त्वाचा घटक असलेल्या व्हेगल टोनला आधार मिळतो.
advertisement
8/9
योगाभ्यास किंवा विश्रांतीचा सराव पचन सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यात मदत करू शकतो. हे सर्व उपाय तुम्हाला तुमची मज्जासंस्था आणि पचनक्रिया यांच्यात सुसंवादाची स्थिती व्यवस्थित ठेवण्यास मदत करू शकते.
advertisement
9/9
योगाभ्यास किंवा विश्रांतीचा सराव पचन सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यात मदत करू शकतो. हे सर्व उपाय तुम्हाला तुमची मज्जासंस्था आणि पचनक्रिया यांच्यात सुसंवादाची स्थिती व्यवस्थित ठेवण्यास मदत करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Stress And Digestion : सतत चिंता आणि तणावात असता? तुमच्या पचनावर होतोय परिणाम! तज्ज्ञांनी सांगितले उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल