Ghee Calories Count : एक चमचा तुपामध्ये किती कॅलरीज असतात? डायट फॉलो करणाऱ्यांना माहितीच हवं 'हे' सत्य..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
अनेकदा तूप खाताना लोकांना वजन वाढण्याची भिती असते. त्यामुळे तुम्ही खात असलेल्या देशी तुपात किती कॅलरीज आहेत हे माहिती असणं गरजेचं असतं.
advertisement
1/7

तूप हा भारतीय स्वयंपाकघराचा एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. तूप त्याच्या सुगंध, चव आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्यामुळे विविध अन्नपदार्थ त्याचा वापर केला जातो.
advertisement
2/7
आयुर्वेदात, तुपाला 'अमृता'समान मानले जाते. तुपातील पोषक तत्त्व आणि त्याच्या आरोग्यासाठी असेलल्या फायद्यांमुळे डॉक्टर देखील अनेकांना आहारात तूपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
advertisement
3/7
अनेकदा तूप खाताना लोकांना वजन वाढण्याची भिती असते. त्यामुळे तुम्ही खात असलेल्या देशी तुपात किती कॅलरीज आहेत हे माहिती असणं गरजेचं असतं. तज्ञांच्या मते, एक चमचा तुपामध्ये अंदाजे 112 ते 135 कॅलरीज आणि 14 ते 15 ग्रॅम हेल्दी फॅट्स असतात.
advertisement
4/7
याशिवाय तूप हे व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के चा एक उत्कृष्ट स्रोत मानले जाते. हे सर्व जीवनसत्त्वे हाडे आणि डोळ्यांसाठी आवश्यक असतात. यामुळे हाडे आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
advertisement
5/7
युशिवाय तुपामध्ये असलेले ब्युटीरिक ॲसिड आतड्यांसाठी चांगले मानले जाते. तूप खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि सूज कमी करण्यास मदत होते.
advertisement
6/7
विशेष म्हणजे उच्च तापमानातही तूपातील पोषक घटक नष्ट होत नाहीत, त्यामुळे ते स्वयंपाकासाठी सुरक्षित असते. घरात रोज बनवले जाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
7/7
मर्यादित प्रमाणात सेवनाने त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास आणि केसांना चमक येण्यास मदत होते. तूपात असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. त्यामुळे तूप खाल्ल्याने हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत होते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ghee Calories Count : एक चमचा तुपामध्ये किती कॅलरीज असतात? डायट फॉलो करणाऱ्यांना माहितीच हवं 'हे' सत्य..