BBM6 Elimination: 12 व्या आठवड्यात येऊन सागर कारंडेचा पत्ता कट, घरातून बाहेर पडताना ढसाढसा रडला 'हा' स्पर्धक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Elimination: घराचा ताबा घेतलेल्या शेवटच्या ८ शिलेदारांमध्ये ट्रॉफीसाठी जीवघेणी चुरस सुरू असतानाच, आजच्या 'भाऊच्या धक्क्यावर' एक मोठा आणि धक्कादायक निकाल समोर आला आहे.
advertisement
1/9

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा ग्रँड फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराचा ताबा घेतलेल्या शेवटच्या ८ शिलेदारांमध्ये ट्रॉफीसाठी जीवघेणी चुरस सुरू असतानाच, आजच्या 'भाऊच्या धक्क्यावर' एक मोठा आणि धक्कादायक निकाल समोर आला आहे.
advertisement
2/9
प्रेक्षकांना आपल्या विनोदाने खळखळून हसवणारा आणि 'चला हवा येऊ द्या' फेम लाडका अभिनेता सागर कारंडे याचा या घरातील प्रवास आज संपला आहे. निर्णायक टप्प्यावर येऊन सागरचं एलिमिनेशन झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असला, तरी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
advertisement
3/9
सागर कारंडे जेव्हा 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाला, तेव्हा तो 'टॉप ५' मध्ये असेलच असा दाट विश्वास प्रेक्षकांना होता. झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहोचलेला सागर बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर परतला होता.
advertisement
4/9
मात्र, सुरुवातीचे काही आठवडे तो गेममध्ये कुठेच दिसत नव्हता. तो शांत होता, आपली मतं मांडत नव्हता आणि म्हणूनच त्याला सुरुवातीला ट्रोलही करण्यात आलं होतं.
advertisement
5/9
सागरच्या एलिमिनेशनचं मुख्य कारण त्याचा दुहेरीपणा असल्याचं बोललं जातंय. घरामध्ये वावरताना सागर प्रत्येकाशी गोड बोलायचा, पण दुसऱ्या क्षणी त्याच व्यक्तीच्या पाठीमागे जाऊन वेगळीच चर्चा करायचा. त्याचा हा स्वभाव प्रेक्षकांना आणि खुद्द घरातील सदस्यांनाही खटकला होता.
advertisement
6/9
अनेकदा टास्कमध्ये संचालक असताना त्याने घेतलेले निर्णय एका विशिष्ट ग्रुपच्या बाजूने बायस असल्याचा आरोप त्याच्यावर झाला. अलीकडच्या भागात विशाल कोटियनशी झालेला त्याचा वाद आणि त्यावेळेस त्याने दाखवलेला अवतार पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. अखेर सागरला निरोप देताना विशाल कोटियन आणि अनुश्री मानेला अश्रू अनावर झाले होते.
advertisement
7/9
सागर कारंडे बाहेर पडताना विशाल आणि अनुश्री त्याला मिठी मारून ढसाढसा रडले. यानंतर आता घरामध्ये विजयाचे ७ प्रबळ दावेदार उरले आहेत राकेश बापट, विशाल कोटियन, राखी सावंत, अनुश्री माने, तन्वी कोलते, दिपाली सय्यद आणि रेवा कौरासे.
advertisement
8/9
या सात जणांपैकी कोणाचं नशीब उजळणार आणि कोण १९ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
advertisement
9/9
मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस मराठी ६' चा महाअंतिम सोहळा १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला आपला नवा महाविजेता मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6 Elimination: 12 व्या आठवड्यात येऊन सागर कारंडेचा पत्ता कट, घरातून बाहेर पडताना ढसाढसा रडला 'हा' स्पर्धक