TRENDING:

Success Story : नेहमीच्या पिकांत मिळतं नव्हतं उत्पन्न, राजेश यांनी केला टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग, लाखात कमाई

Last Updated:
तरुण शेतकरी राजेश नवनाथ राठोड यांनी शेतीमध्ये असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टरबूज शेती केली आहे.
advertisement
1/7
नेहमीच्या पिकांत मिळतं नव्हतं उत्पन्न, टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग, लाखात कमाई
शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरीही मागे नाहीत.
advertisement
2/7
बीडमधील तरुण शेतकरी राजेश नवनाथ राठोड यांनी शेतीमध्ये असाच एक प्रयोग केला आहे. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टरबूज शेती केली आहे. यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
3/7
राजेश नवनाथ राठोड यांना तीन एकर शेती आहे. त्यांनी शेतीमध्ये दरवर्षीप्रमाणे कापूस पिकाची लागवड केली होती, मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते चिंतेत होते. वाढता खर्च, अनिश्चित हवामान आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे कापसातून समाधानकारक नफा मिळत नव्हता.
advertisement
4/7
त्यामुळे त्यांनी शेतामध्ये नवीन काहीतरी करण्याचे ठरवले आणि तीन एकरातील कापूस पूर्णपणे उपटून टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्याचा हा टरबूज शेतीचा पहिलाच प्रयोग होता.
advertisement
5/7
राजेश राठोड यांनी आधुनिक पद्धतीने टरबूज लागवड केली. योग्य बियाण्यांची निवड, ठिबक सिंचनाचा वापर आणि वेळेवर खत व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
advertisement
6/7
मेहनतीसोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी माल थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या नियोजनबद्ध शेतीचा परिणाम पहिल्याच हंगामात दिसून आला.
advertisement
7/7
65 दिवसांत त्यांचे पीक काढणीला आले. पहिल्याच तोडीत त्यांना 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून यामध्ये खर्च वजा जाता 2 लाख रुपये शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अजून एक ते दोन तोडे निघण्याची शक्यता असून अंतिम उत्पन्नात आणखी वाढ होईल, असा त्यांचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : नेहमीच्या पिकांत मिळतं नव्हतं उत्पन्न, राजेश यांनी केला टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग, लाखात कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल