TRENDING:

IND vs ZIM : 'डू ऑर डाय' मॅचआधी फक्त दोन खेळाडू पोहोचले प्रॅक्टीसला, टीम इंडियाला ओव्हर कॉन्फिडन्स महागात पडणार?

Last Updated:
आता टीम इंडियाचा पुढचा सामना हा झिम्बाबे आणि वेस्ट इंडिज विरूद्ध असणार आहे. हा सामना जरी टीम इंडियाने जिंकला तरी सेमी फायनलला पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
advertisement
1/7
'डू ऑर डाय' मॅचआधी फक्त दोन खेळाडू पोहोचले प्रॅक्टीसला, टीम इंडियाला ओव्हर कॉन्फ
टीम इंडियाचा सुपर 8 मधला दुसरा सामना हा उद्या 26 जानेवारी 2026 ला झिम्बाबे विरूद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्याला चेन्नईमध्ये संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सूरुवात होणार आहे.
advertisement
2/7
या सामन्याआधी टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेविरूद्धचा सामना हा 76 धावांनी गमावला होता. हा सामना हारल्यामुळे टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचण अवघड झालं आहे.
advertisement
3/7
आता टीम इंडियाचा पुढचा सामना हा झिम्बाबे आणि वेस्ट इंडिज विरूद्ध असणार आहे. हा सामना जरी टीम इंडियाने जिंकला तरी सेमी फायनलला पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
advertisement
4/7
त्यामुळे आता टीम इंडियासमोर आता 'डू ऑर डाय'(करो या मरो) सारखी परिस्थिती आहे. या परिस्थितीत टीम इंडियाने केलेली एक चूक त्यांचा सेमी फायनलमधला प्रवेश रोखू शकते.
advertisement
5/7
असे असताना देखील टीम इंडियाचे खेळाडू सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेताना दिसत नाही आहेत. कारण आज प्रॅक्टीस सेशनला गौतम गंभीरसह फक्त 2 खेळाडू प्रॅक्टीसला पोहोचले होते. बाकी उर्वरीत 9 खेळाडूंनी मात्र दांडी मारली होती.
advertisement
6/7
त्यामुळे टीम इंडिया खरंच गांभीर्याने वर्ल्ड कप खेळतेय का असा सवाल उपस्थित होत आहे.कारण 24 तासांवर सामना आहे आणि खेळाडू रुममध्ये आराम फरमावत आहेत.
advertisement
7/7
खरं तर हा ऑप्शनल म्हणजेच पर्यायी सराव होता. त्यामुळे कदाचित खेळाडू आराम करत असतील.पण टीम इंडियाची वर्ल्ड कपमधली परिस्थिती पाहता ते कोणत्याही क्षणी स्पर्धेबाहेर होण्याची भीती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ZIM : 'डू ऑर डाय' मॅचआधी फक्त दोन खेळाडू पोहोचले प्रॅक्टीसला, टीम इंडियाला ओव्हर कॉन्फिडन्स महागात पडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल