South Comedy Movie: हे 6 चित्रपट तुम्हाला हसवून रडवतील, येत्या विकेंडला फॅमिलीसोबत ओटीटीवर पाहा खास सिनेमे
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
टॉलिवूड चित्रपटांची फक्त थिएटरमध्येच नाही तर, ओटीटीवरही जोरदार चर्चा पाहायला मिळते. खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक, उत्कंठावर्धक ट्विस्ट आणि जबरदस्त कॉमेडी असणारे चित्रपट सध्या ओटीटीवर कमालीचे चर्चेत आले आहेत. हे असे चित्रपट आहेत जे की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फूल टू एन्टरटेन्मेंट म्हणून अगदी सहजच पाहू शकणार आहेत. ओटीटीवर फूल्ल टू कॉमेडी करणारे कोणकोणते चित्रपट आहेत? जाणून घेऊया...
advertisement
1/8

सध्या बॉक्स ऑफिसवर टॉलिवूड चित्रपटांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये टॉलिवूड चित्रपट असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचे कथानक कमालीचे चर्चेत राहत आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही चित्रपट सजेस्ट करणार आहोत, जे पाहून तुम्ही लोटपोट हसाल.
advertisement
2/8
IMDB च्या यादीमध्ये अव्वल स्थानावरील चित्रपट आम्ही तुम्हाला सजेस्ट करत आहोत. हे चित्रपट पाहून तुम्ही फक्त हसणारच नाही, तर ते तुमच्या मनावर नक्कीच अधिराज्य गाजवतील. हे असे हिट चित्रपट कोणकोणते आहेत? जाणून घेऊयात...
advertisement
3/8
IMDB च्या यादीमध्ये सर्वाधिक रेटिंग असणारा 'लब्बुर पंधु' चित्रपट तुम्ही पाहू शकता. 'गल्ली क्रिकेटचे' या चित्रपटामध्ये चित्रण करण्यात आले आहे. क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर आणि नवख्या खेळाडूच्या खेळणाऱ्यांवर हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटामध्ये फक्त क्रिकेट मॅचबद्दल नाही तर, त्यांच्यातील अहंकार, दोन पिढ्यांमधला राग अशा अनेक गोष्टींचे चित्रण केले.
advertisement
4/8
'मधु वडालारा' या चित्रपटाला IMDBच्या यादीमध्ये 8.2 इतके रेटिंग्स मिळाले. कॉमेडी- सस्पेन्स चित्रपटामध्ये दोन डिलेव्हरी बॉईज असतात. त्यांना कमी पगार असल्यामुळे ते प्रॉडक्ट डिलेव्हरीच्या वेळी गिर्‍हाईकांना लुटण्याचा प्रयत्न करत असतात. एक दिवशी एका गुन्ह्यामध्ये हे दोघेही मित्र विचित्र पद्धतीमध्ये फसतात. एक छोटी चूक त्यांना कशापद्धतीने आयुष्य भरासाठी शिकवण देऊन जाते, हे चित्रपट पाहिल्यावर कळते.
advertisement
5/8
'जान. ए. मन' चित्रपटाला IMDBच्या यादीमध्ये 7.8 इतके रेटिंग्स होते. एका ठिकाणी आनंद आणि दुसऱ्या ठिकाणी दु:ख अशा गोष्टी चित्रपटामध्ये पाहायला मिळतील. एका घरामध्ये वाढदिवस सेलिब्रेट केला जात होता आणि एका घरात व्यक्तीचे निधन झाले आहे, असे दाखवले.
advertisement
6/8
'रोमंचम' चित्रपटाच्या कथेमध्ये प्रेक्षकांना बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या सात अविवाहित तरूणांची कथा दाखवते. जे कंटाळा दूर करण्यासाठी काही विचित्र गोष्टींचा वापर करतात. चित्रपटाला IMDBच्या यादीमध्ये 7.5 इतके रेटिंग्स आहेत. हा हॉरर- कॉमेडी चित्रपट असून प्रेक्षकांना नक्कीच पोट दुखेपर्यंत हसवणारा चित्रपट आहे. चित्रपटातलं बॅकग्राऊंड म्युझिक चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेत.
advertisement
7/8
'जाथी रत्नलू' चित्रपटाला IMDBच्या यादीमध्ये 7.4 इतके रेटिंग्स होते. चित्रपटाच्या कथानकामध्ये कमी बुद्धी असलेले तीन मित्र असतात. ते आपले नशीब आजमावण्यासाठी हैदराबादला जातात, परंतु नकळत एका मोठ्या राजकीय कटात अडकतात. या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना परिस्थिती आणि डायलॉग्स सुरुवातीपासून कोर्टरूम ड्रामापर्यंत खुर्चीशी खिळवून ठेवतील.
advertisement
8/8
'डॉक्टर' मध्ये शिवकार्तिकेयनने लष्करी डॉक्टरची भूमिका साकारली. त्याच्या पुतणीचे अपहरण झाल्याचे दाखवले आहे. तो तिला वाचवण्यासाठी एक विचित्र आणि हास्यास्पद योजना आखतो. ही कोणत्या प्रकारची योजना आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. चित्रपटाला IMDBच्या यादीमध्ये 7.4 इतके रेटिंग्स होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
South Comedy Movie: हे 6 चित्रपट तुम्हाला हसवून रडवतील, येत्या विकेंडला फॅमिलीसोबत ओटीटीवर पाहा खास सिनेमे