
मुंबई : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर हा कायम असणार आहे. कोकणमध्य महाराष्ट्रातील घाटमाथा इथे तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, सातारा पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे. 5 ऑगस्टनंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. 3 ऑगस्टसाठी साताऱ्याला रेड अलर्ट तर 4 ऑगस्टसाठी सातारा, पुणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहूयात पुढील 24 तासांसाठी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.