ये क्या हुआ? फराह खानचा 52 वर्षांचा नवरा अचानक दिसू लागला 25शीतील तरूण! हा कायापाटल झाला कसा?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
फराह खानचा नवरा शिरीष कुंदरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 52 वर्षांचा शिरीष कुंदर अचानक 25 वर्षांचा दिसू लागला आहे.
advertisement
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान तिच्या युट्यूबवरील कुकींग व्हिडीओमध्ये सातत्यानं चर्चेत असतात. पण यावेळी फराहचा नवरा चित्रपट निर्माता शिरीष कुंदर चर्चेत आला आहे. शिरीषनं केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
advertisement
2/8
नेहमी लाइमलाइटपासून दूर असलेला शिरीष त्याच्या एका पोस्टनं व्हायरल झाला आहे. कारण 52 वर्षांचा शिरिष अचानक 25 वर्षांचा तरूण दिसू लागला आहे. त्याचा हा कायापालट नेमका झाला कसा?
advertisement
3/8
शिरीष कुंदर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याचं दिसत आहे. त्याच्या लेटेस्ट फोटोंमध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. तो पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि तरुण दिसत आहेत.
advertisement
4/8
एका फोटोमध्ये ते आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये तो शर्टलेस आहे. तो खूप कॉन्फिडन्ट दिसत आहे. काही पोस्टमध्ये त्यांनी शार्प आणि स्टायलिश सूट वेअर केलेला दिसत आहे. हाय-फॅशन अवतारात तो खूप अत्यंत क्लासी दिसत आहेत.
advertisement
5/8
त्यांचा एक खास फोटो, ज्यामध्ये ते विमानाच्या आत बसलेले दिसतात, त्यानेही चाहत्यांची उत्सुकता वाढवली. अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की ते नेमके कोणत्या ठिकाणी प्रवास करत आहेत. मात्र त्यांनी आपल्या ट्रॅव्हल प्लॅनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
advertisement
6/8
या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.हे फोटो एआयच्या मदतीने तयार केले आहेत का किंवा त्यात फोटोशॉपचा वापर करण्यात आला आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
advertisement
7/8
या सगळ्या चर्चेत फराह खानची प्रतिक्रिया देखील लक्षवेधी ठरली. त्याने शिरीषच्या एका पोस्टवर 'कुठे चाललात का? असं म्हणत लाफ्टर इमोजी शेअर केला आहे.
advertisement
8/8
फराह आणि शिरीष यांची भेट 'में हू ना' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्या वेळी फराह दिग्दर्शिका होती तर शिरीष एडिटिंगची जबाबदारी सांभाळत होता. कामाच्या निमित्ताने दोघे जवळ आले आणि 2004 मध्ये त्यांनी लग्न केले. वयात सुमारे 8 वर्षांचे अंतर आहे. 2008 मध्ये त्यांनी आपल्या तीन मुलांचे स्वागत केले. फराहने तिळ्यांना जन्म दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ये क्या हुआ? फराह खानचा 52 वर्षांचा नवरा अचानक दिसू लागला 25शीतील तरूण! हा कायापाटल झाला कसा?