TRENDING:

T20 World Cup : अभिषेक शर्माला डिमोशन का डच्चू? टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसने सगळं क्लिअर केलं!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये गुरूवारी टीम इंडियाचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो चा असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चेन्नई : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये गुरूवारी टीम इंडियाचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो चा असणार आहे, कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आता एकही पराभव टीम इंडियासाठी सेमी फायनलचे दरवाजे बंद करू शकतो. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ग्रुप स्टेजच्या सर्व 4 सामन्यांमध्ये विजय झाला, पण सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला.
अभिषेक शर्माला डिमोशन का डच्चू? टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसने सगळं क्लिअर केलं!
अभिषेक शर्माला डिमोशन का डच्चू? टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसने सगळं क्लिअर केलं!
advertisement

ग्रुप स्टेज आणि सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंगला बहुतेक वेळा संघर्ष करावा लागला. खासकरून अभिषेक शर्माचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. ग्रुप स्टेजच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये अभिषेक शून्य रनवर आऊट झाला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेकला बॅटला बॉल लावण्यातही अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक खेळणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

advertisement

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी चेन्नईच्या स्टेडियमवर नेट प्रॅक्टिस केली. या नेट प्रॅक्टिसमधून अभिषेक शर्मा खेळणार का नाही? याचेही संकेत मिळाले आहेत.

advertisement

टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसमध्ये काय झालं?

टीम इंडियाने मॅचच्या आधी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये प्रॅक्टिस केली. या प्रॅक्टिसवेळी मेन नेट्समध्ये इशान किशनसोबत संजू सॅमसन प्रॅक्टिस करत होता. टीम इंडियामध्ये बहुतेक वेळा जे खेळाडू ज्या बॅटिंग पोजिशनवर खेळतात त्याच क्रमांकावर नेट प्रॅक्टिसही करतात. नेटमध्ये संजू आणि इशान यांनी एकत्र बॅटिंग केल्यामुळे आता मॅचमध्येही दोघं ओपनिंगला खेळणार का? याबाबतचे संकेत मिळाले आहेत.

advertisement

अभिषेक शर्माला टीममधून डच्चू मिळणार का त्याचं डिमोशन होणार? याचाही सस्पेन्स निर्माण झाला आहे, कारण नेटमध्ये अभिषेक शर्मा बॉलिंगही करत होता.

advertisement

अभिषेकप्रमाणेच तिलक वर्माही फॉर्मसाठी संघर्ष करत आहे, त्यामुळे तिलकनेही नेटमध्ये सराव केला. तर अभिषेक शर्मा नंतर वेगळा बॅटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी आला, पण तो टीमच्या मुख्य नेटचा भाग नव्हता, त्यामुळे तो टीम इंडियाच्या प्रमुख बॉलरचा नाही तर नेट बॉलरचा सामना करत होता. नेट बॉलरमध्येही स्पिनर अभिषेकला जास्त बॉलिंग करत होते.

अभिषेकची निराशाजनक कामगिरी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीत अपयश का येते? कोणत्या होतात व्यावसायिक चुका, कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
सर्व पहा

अभिषेक शर्मा ग्रुप स्टेजमध्ये 4 पैकी 3 सामन्यांमध्ये खेळला. यातल्या तिन्ही सामन्यांमध्ये अभिषेक शून्य रनवर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये अभिषेकने 15 रनची खेळी तर केली, पण या रन करताना त्याला अडचणींचा सामना करावा लागत होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माऐवजी तिलक वर्माला बाहेर करून त्याच्याऐवजी संजू सॅमसनला टीममध्ये आणण्याचाही विचार केला जाऊ शकतो. असं झालं तर अभिषेक किंवा इशान या दोघांपैकी एक जण तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : अभिषेक शर्माला डिमोशन का डच्चू? टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसने सगळं क्लिअर केलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल