उद्या सूर्य-चंद्राची खतरनाक युती, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; येणार मोठं संकट!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या 2026 मधले पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. असं मानलं जात की सूर्यग्रहणाचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यवर होतो. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही शनीच्या कुंभ राशीत असतील.
advertisement
1/5

उद्या 2026 मधले पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. असं मानलं जात की सूर्यग्रहणाचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यवर होतो. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही शनीच्या कुंभ राशीत असतील. या राशीत दोघांचीही होणारी युती काही राशींसाठी आव्हानात्मक ठरेल. काही विशिष्ट राशीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना या दिवशी करावा लागणार आहे.
advertisement
2/5
2026 मधले हे पहिले सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपात होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे ग्रहण अत्यंत विनाशकारी आणि आव्हानात्मक मानले जात आहे. या ग्रहणाच्या वेळी कुंभ राशीमध्ये सूर्य, चंद्र, राहू, बुध आणि शुक्र अशा पाच ग्रहांची युती होत आहे. त्यातच सूर्य आणि चंद्राची ही युती काही राशींच्या आयुष्यात मोठे वादळ घेऊन येऊ शकते.
advertisement
3/5
मेष - आर्थिक हानी आणि अपघाताची भीती: मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण 11 व्या भावात होत असले तरी, सूर्य-चंद्र युती तुमच्या लाभावर परिणाम करेल. तुम्हाला गुंतवणुकीत मोठा फटका बसू शकतो. घाईघाईत घेतलेले निर्णय तुम्हाला कर्जाच्या ओझ्यात ढकलू शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावध राहा, अपघाताचे योग आहेत.
advertisement
4/5
कर्क - मानसिक अस्वस्थता आणि आरोग्य: कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि तो सूर्यासोबत राहूच्या विळख्यात अडकला आहे. विनाकारण भीती आणि अस्वस्थता जाणवेल. घरातील वरिष्ठांचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे धावपळ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर खोटे आरोप होण्याची शक्यता असल्याने सावध राहा.
advertisement
5/5
मकर - नात्यात दुरावा आणि फसवणूक: मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण दुसऱ्या स्थानी होत आहे. बोलण्यावर नियंत्रण न राहिल्याने कुटुंबात मोठे वाद होतील. जवळच्या व्यक्तीकडून किंवा व्यावसायिक जोडीदाराकडून तुमची फसवणूक होऊ शकते. साडेसातीचा प्रभाव असल्याने कष्टाचे फळ मिळण्यास विलंब होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उद्या सूर्य-चंद्राची खतरनाक युती, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; येणार मोठं संकट!