नाकावर राग पण मनाने साफ! 'या' 4 मूलांकाच्या मुली असतात अत्यंत रागीट; तुमची जन्मतारीख आहे का यात?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख केवळ तिचे भविष्यच नाही, तर तिचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व देखील उलगडत असते. प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो, ज्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या वागण्यावर होतो.
advertisement
1/7

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख केवळ तिचे भविष्यच नाही, तर तिचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व देखील उलगडत असते. प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो, ज्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या वागण्यावर होतो.
advertisement
2/7
काही मूलांकांच्या मुली स्वभावाने अत्यंत शांत असतात, तर काही मूलांकांच्या मुली अशा असतात ज्यांना राग नाकावर असतो. अंकशास्त्रात अशा काही विशेष मूलांकांचा उल्लेख आहे, ज्यांच्या मुली खूप लवकर चिडतात आणि तितक्याच संवेदनशील किंवा भावूक असतात.
advertisement
3/7
अंकशास्त्रानुसार, 1 ते 9 या मूलांकांपैकी काही अंक हे अग्नी तत्त्वाचे तर काही जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात. ज्या मुलींच्या मूलांकावर मंगळ किंवा सूर्य यांसारख्या उष्ण ग्रहांचा प्रभाव असतो, त्या स्वभावाने रागीट असतात. तर चंद्राचा प्रभाव असलेल्या मुली भावूक असतात.
advertisement
4/7
मूलांक 1 (जन्म तारीख: 1, 10, 19, 28): या मूलांकाचा स्वामी 'सूर्य' आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या मुलींमध्ये नेतृत्वगुण उपजत असतात. त्यांना कोणाच्याही हाताखाली राहायला आवडत नाही. जर कोणी त्यांच्या कामात अडथळा आणला, तर त्यांना लवकर राग येतो. मात्र, आतून त्या खूप हळव्या असतात आणि जवळच्या व्यक्तींसाठी काहीही करायला तयार असतात.
advertisement
5/7
मूलांक 2 (जन्म तारीख: 2, 11, 20, 29): मूलांक 2 चा स्वामी 'चंद्र' आहे. या मुली अत्यंत भावूक आणि संवेदनशील असतात. छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला लागतात. त्यांचे मन स्थिर नसते. जेव्हा त्यांना कोणी दुखावते, तेव्हा त्या रागात काहीही बोलून जातात आणि नंतर स्वतःच रडत बसतात.
advertisement
6/7
मूलांक 8 (जन्म तारीख: 8, 17, 26): या मूलांकाचा स्वामी 'शनी' आहे. या मुलींना शिस्त खूप प्रिय असते. त्यांना खोटेपणा अजिबात सहन होत नाही. अन्यायाविरुद्ध त्या लगेच चिडतात. त्यांचा राग शांत व्हायला वेळ लागतो, पण त्या मनाने खूप स्वच्छ असतात. स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा लोक त्यांना रागीट समजतात.
advertisement
7/7
मूलांक 9 (जन्म तारीख: 9, 18, 27): मूलांक 9 चा स्वामी 'मंगळ' आहे, जो रागाचा कारक मानला जातो. या मुली अत्यंत धाडसी पण तितक्याच रागीट असतात. एकदा राग आला की त्या कोणाचेही ऐकत नाहीत. मात्र, एकदा राग निवळला की त्या पुन्हा तितक्याच प्रेमाने वागतात. त्यांच्या रागामागे अनेकदा इतरांबद्दल असलेली काळजी दडलेली असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
नाकावर राग पण मनाने साफ! 'या' 4 मूलांकाच्या मुली असतात अत्यंत रागीट; तुमची जन्मतारीख आहे का यात?