भारतात दिसणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण! 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार, सर्व स्वप्न पूर्ण होणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
17 तारखेला 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण लागलं. या ग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसांत आकाशात पुन्हा एकदा एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार असून, विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे.
advertisement
1/7

17 तारखेला 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण लागलं. या ग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसांत आकाशात पुन्हा एकदा एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार असून, विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे.
advertisement
2/7
वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसले नसल्याने त्याचे वेध लागले नव्हते, मात्र 3 मार्चचे चंद्रग्रहण भारतीयांसाठी धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच होलिका दहन आणि होळीच्या मुहूर्तावर हे ग्रहण येत असल्याने या काळात काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
चंद्रग्रहणाची वेळ: भारतीय वेळेनुसार, ग्रहणाची सुरुवात दुपारी 2:16 वाजता होईल, परंतु भारतात चंद्रोदयानंतर संध्याकाळी ते दृश्यमान होईल. प्रामुख्याने संध्याकाळी 6:26 ते 6:47 या काळात ग्रहणाचे दर्शन होईल. भारतात हे ग्रहण दिसत असल्यामुळे याचा सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी 9:39 वाजल्यापासून सुरू होईल.
advertisement
4/7
वृषभ - आर्थिक सुबत्ता: चंद्रग्रहणाचा सर्वात सकारात्मक परिणाम वृषभ राशीवर दिसून येईल. तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. जुनी अडकलेली कामे पूर्ण होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. करिअरमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असून धनलाभाचे प्रबळ योग आहेत.
advertisement
5/7
सिंह - पदोन्नती आणि मानसन्मान: हे ग्रहण सिंह राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हे भाग्योदयाचे ठरेल. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधी मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. जे लोक परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.
advertisement
6/7
धनु - गुंतवणुकीतून प्रॉफिट: धनु राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण प्रगतीचे नवे मार्ग उघडणारे ठरेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता मोठा परतावा मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारतील आणि व्यवसायात नवीन करार होऊन मोठी आर्थिक भरभराट होईल.
advertisement
7/7
होळी आणि ग्रहणाचा संयोग: होळीच्या दिवशी ग्रहण असल्याने होलिका दहन सूतक काळापूर्वी किंवा विशेष मुहूर्त पाहून करणे शास्त्रशुद्ध ठरेल. ग्रहणाच्या सावटामुळे या दिवशी जप-तपाचे महत्त्व अधिक वाढणार आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
भारतात दिसणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण! 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार, सर्व स्वप्न पूर्ण होणार