अखेर प्रतीक्षा संपली! तब्बल 12 वर्षांनंतर गुरू गोचर; 'या' 3 राशींचे नशीब पालटणार, होणार मालामाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये 'देवगुरू बृहस्पती' यांना सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचा कारक मानले जाते. जेव्हा गुरू ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा खोलवर परिणाम सर्व 12 राशींवर होतो.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रामध्ये 'देवगुरू बृहस्पती' यांना सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचा कारक मानले जाते. जेव्हा गुरू ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा खोलवर परिणाम सर्व 12 राशींवर होतो.
advertisement
2/7
2026 हे वर्ष गुरुग्रहाच्या संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः 2 जून 2026 रोजी देवगुरू बृहस्पती मिथुन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच 'कर्क' राशीत प्रवेश करणार आहेत.
advertisement
3/7
तब्बल 12 वर्षांनंतर गुरू आपल्या उच्च राशीत प्रवेश करत असल्याने काही राशींसाठी 'राजयोग' निर्माण होणार आहे. यामुळे या तीन राशींच्या व्यक्ती 2026 मध्ये आर्थिकदृष्ट्या प्रचंड प्रबळ होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
4/7
12 वर्षांनंतरचा सुवर्णयोग: गुरु ग्रह साधारणपणे एका राशीत 12 महिने असतो. पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी त्याला 12 वर्षे लागतात. 2026 मध्ये गुरू कर्क राशीत येत असल्याने त्याची शक्ती अनेक पटीने वाढणार आहे. यामुळे रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.
advertisement
5/7
कर्क रास - सुवर्णकाळ सुरू: गुरूचे संक्रमण कर्क राशीतच होणार असल्याने या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष स्वप्नवत ठरेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल आणि नवीन व्यवसायातून मोठा धनलाभ होईल. अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग असून वैवाहिक जीवन सुखी राहील.
advertisement
6/7
कन्या रास - उत्पन्नात प्रचंड वाढ: कन्या राशीच्या जातकांसाठी गुरूचे हे संक्रमण 11 व्या स्थानी होणार आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळू शकतो. शेअर मार्केट किंवा लॉटरीमधून धनलाभाचे संकेत आहेत. मुलांकडूनही शुभ बातमी मिळेल.
advertisement
7/7
धनु रास - नशिबाची भक्कम साथ: धनु राशीचा स्वामी स्वतः गुरू आहे. 2026 मध्ये गुरूचे उच्च राशीतील भ्रमण तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ देईल. स्पर्धा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटून तुम्हाला मोठा हिस्सा मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासाचे योगही येतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अखेर प्रतीक्षा संपली! तब्बल 12 वर्षांनंतर गुरू गोचर; 'या' 3 राशींचे नशीब पालटणार, होणार मालामाल