TRENDING:

डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि अकाली वृद्धत्व? महागड्या क्रीम्स नको, फक्त 'ही' एक सवय बदला; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

बीड

बीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरा झोपणे ही अनेकांची सवय बनली आहे. मोबाईल, सोशल मीडिया, टीव्ही, ऑनलाइन काम किंवा मानसिक ताणतणाव यामुळे झोपेची नैसर्गिक वेळ मागे पडत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम केवळ थकव्यापुरते मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम शरीराच्या एकूण आरोग्यावर होत आहे. वेळेवर आणि पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील जैविक घड्याळ बिघडते आणि विविध आजारांची शक्यता वाढते, असे बीड येथील आरोग्य तज्ज्ञ राहुल वेताळ सांगतात.

Last Updated: Dec 29, 2025, 17:45 IST
Advertisement

थर्टीफर्स्टला घरच्याघरीच बनवा झटपट आणि चविष्ट 'कोंबडी वडे', एका क्लिकवर पाहा रेसिपी; Video

Food

ठाणे - कोकणात सगळ्यात जास्त कोंबडी वडे हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या घरगुती पिठापासून हे कोंबडी वडे बनवले जातात. हॉटेलमध्ये या कोंबडी वड्यांची किंमत 200 ते 300 रुपये असते. हे खाण्यासाठी सगळ्यांना आवडतात. मात्र, ते बनवणे फार कठीण आहे. म्हणून आज हीच रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात म्हणजे तुम्हीही तुमच्या घरी पटकन बनवू शकता.

Last Updated: Dec 29, 2025, 19:27 IST

उमेदवारी नाकारल्याने शिवसेना नेत्याच्या डोळ्यात पाणी, VIDEO

छ.संभाजी नगरमधील शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जागावाटपावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "युती मध्ये कमी जागा आहेत. पण त्यासगळ्या जागा निवडून येण्यासारख्या आहेत. मी स्वतः निवडणुक लढवणार नाही. एखादा चांगला कार्यकर्ता उभा करुन त्याला निवडून देऊ"

Last Updated: Dec 29, 2025, 19:16 IST
Advertisement

भंडारामध्ये कोरंभी परिसरात पट्टेरी वाघाचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल, VIDEO

भंडारा जिल्ह्यात कोरंभी परिसरात एका पट्टेरी वाघांच दर्शन घडंलं आहे. काही नागरिक गोसेखुर्द धरणाकडे जात असताना त्यांना हा वाघ दिसला. त्यांनी प्रसंगावधानाने त्या वाघाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 18:23 IST

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला कानमंत्र नेमका काय ? VIDEO

ठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे." असा संदेश राज ठाकरेंनी मेळाव्यात दिला.

Last Updated: Dec 29, 2025, 17:56 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि अकाली वृद्धत्व? महागड्या क्रीम्स नको, फक्त 'ही' एक सवय बदला; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल