पूर्वी लोक जुने कपडे घालू होळी खेळात असत. त्यामुळे कपडे खराब झाले तरी ते टाकून दिले जायचे. मात्र हल्ली लोक आवर्जून पांढरे कपडे घालून रंग खेळतात. यासाठी बऱ्याचदा लोक नवे कपडे विकत घेतात. मग अशा कपड्यांवरचे डाग निघाले नाहीत तर नुकसान होऊ शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला काही भन्नाट ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही कपड्यांवरचे रंग सहज काढू शकाल आणि तुम्हला तेच कपडे परत वापरता येतील.
advertisement
सोशल मीडियावर संगल शुक्ला यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी कपड्यांवरून होळीचा रंग काढण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. चला पाऊया त्या त्यांनी सनईतलेले खास उपाय.
या स्टेप्स फॉलो करून काढा कपड्यांवरचा रंग..
- सर्वात आधी होळीचे रंग काढण्यासाठी कपडे साध्या पाण्यात 4-5 तास भिजवा. कपडे भिजवण्यासाठी भरपूर पाणी वापरा आणि डिटर्जंट वापरू नका. रंग खूप घट्ट असेल तर तुम्ही हे कपडे रात्रभर भिजवू शकता. यामुळे तंतूंमध्ये अडकलेला रंग सैल होतो आणि नंतर तो काढणे सोपे होते.
- यानंतर साध्या पाण्यातून कपडे काढा आणि ते पिळा. बादलीत 2-3 चमचे ब्लीचिंग पावडर घ्या. त्यामध्ये 2-3 चमचे बेकिंग सोडा आणि डिटर्जंट घाला. आता पाण्यातून काढलेले कपडे या मिश्रणात 20 मिनिटे भिजवा. यामुळे रंग आणखी व्यवस्थित निघू लागेल. संगम शुक्लाच्या मते, ब्लीचिंग पॉवर वाढवण्यासाठी बादली सूर्यप्रकाशात ठेवा. कारण ब्लीच सूर्यप्रकाशात वेगाने काम करते.
- यानंतर एक कपडे धुण्याच्या ब्रश घ्या. त्याने ज्या ठिकाणी तुम्हाला डाग दिसत आहेत, त्या ठिकाणी घासा. यानांतर कपडे मिश्रणातून काढा आणि पिळा. हे कपडे आता स्वच्छ पाण्याने चांगले धुवा, जेणेकरून रंग, ब्लिच आणि डिटर्जंट पूर्णपणे निघेल.
- ब्लीच वापरल्यानंतर कधी कधी कपड्यांवर हलका पिवळा रंग दिसतो. हे काढण्यासाठी साधे पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडे रंगकाट म्हणजेच सोडियम हायड्रो सल्फेट टाका. 20 मिनिटांसाठी या द्रावणात कपडे भिजवा. याने पिवळा रंग निघेल आणि कपडे पुन्हा शुभ्र पांढरे दिसतील.
- यानंतर शेवटी पाण्यामध्ये ऑक्सॅलिक ग्रॅन्यूल घाला आणि ते विरघळवा. या द्रावणात कपडे 5 ते 7 मिनिटे भिजवा. ऑक्सॅलिक अॅसिडमधून वायू उत्सर्जित होतो. त्यामुळे हे नेहमी उघड्या मोकळ्या जागेत वापरा. या द्रवनातू काढून कपडे साध्या पाण्याने 2-3 वेळा धुवा आणि नंतर वाळवा. अशा पद्धतीने तुमच्या कपड्यांवरचा रंग पूर्णपणे निघेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
