TRENDING:

तब्बल 150 वर्षांची परंपरा, सर्वात स्वस्त बांगड्यांची लेन, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

या परिसरातील सुमारे 150 वर्षांची परंपरा असलेली बांगड्यांची लेन आजही महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पुणे शहरातील तुळशीबाग परिसर आजही जुन्या परंपरांसाठी ओळखला जातो. या परिसरातील सुमारे 150 वर्षांची परंपरा असलेली बांगड्यांची लेन आजही महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. लग्नसराई, सण-उत्सव किंवा दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या बांगड्या येथे स्वस्त दरात उपलब्ध असल्याने पुणेकरांसह बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांचीही येथे कायम गर्दी असते.
advertisement

तुळशीबागेतील या अरुंद पण गजबजलेल्या लेनमध्ये रांगेत असलेली जुनी दुकाने परंपरेची साक्ष देतात. रोजच्या वापरासाठी साध्या काचेच्या बांगड्यांपासून ते नवरीसाठी खास डिझाइनच्या, पारंपरिक आणि आकर्षक बांगड्यांची मोठी रेलचेल येथे पाहायला मिळते. बदलत्या फॅशननुसार विविध रंग, डिझाइन आणि प्रकार उपलब्ध असल्यामुळे तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वच वयोगटातील ग्राहक येथे खरेदीसाठी येतात.

advertisement

गावातील वाया जाणाऱ्या पाण्याचा असाही उपयोग, माऊली यांचा 'हराळवाडी पॅटर्न' चर्चेत, नेमकं काय केलं?

या व्यवसायाबाबत माहिती देताना व्यापारी अक्षय जव्हेरी सांगतात, मी हा व्यवसाय गेली 10 वर्षे करत असून माझे वडील 35 वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. या व्यवसायाची सुरुवात आमच्या आजोबांनी केली. जवळपास 150 वर्षांची परंपरा असलेला हा व्यवसाय तीन ते चार पिढ्यांपासून चालत आला आहे. त्यांच्या मते, सध्या या लेनमध्ये सुमारे 30 ते 40 व्यावसायिक बांगड्यांचा व्यवसाय करतात. 1940 सालापासून या ठिकाणी बांगड्यांची विक्री अधिक संघटित पद्धतीने सुरू झाली आणि कालांतराने ही लेन पुण्यातील महत्त्वाचे खरेदी केंद्र बनली.

advertisement

येथे रेशमी, रेन ड्रॉप, प्लेन, डिझाइन कडे मेटल, तसेच काश्मिरी घुंगरू असलेल्या अशा विविध प्रकारच्या बांगड्या उपलब्ध आहेत. लग्नासाठी खास हिरव्या काचा, सोनसळी डिझाइन, स्टोनवर्क, तसेच आधुनिक फॅशननुसार तयार केलेले सेट्सही ग्राहकांना आकर्षित करतात. बांगड्या 1 डझन, 10 डझन किंवा 14 डझन अशा विविध प्रमाणात उपलब्ध असतात. पूर्वी काचेच्या बांगड्या 8 ते 10 रुपये डझन दराने मिळत होत्या मात्र वाढती महागाई आणि उत्पादन खर्चामुळे सध्या त्या 40 रुपये डझनपासून पुढे उपलब्ध आहेत. तरीही इतर ठिकाणांच्या तुलनेत येथे परवडणारे दर आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 वर्षांची परंपरा, सर्वात स्वस्त बांगड्यांची लेन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

तुळशीबागेतील बांगड्यांची लेन ही केवळ खरेदी-विक्रीचे ठिकाण नाही, तर पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सणासुदीच्या काळात येथे विशेष गर्दी दिसून येते. नवरात्री, दिवाळी, लग्नसराईच्या हंगामात या लेनमध्ये रंगांची उधळण पाहायला मिळते. पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचा समतोल साधत ही बांगड्यांची लेन आजही 150 वर्षांची परंपरा जपत नव्या पिढीच्या आवडीनिवडींनुसार स्वतःला बदलत आहे. त्यामुळेच तुळशीबागेतील ही ऐतिहासिक बांगड्यांची लेन पुणेकरांच्या मनात आजही खास स्थान राखून आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
तब्बल 150 वर्षांची परंपरा, सर्वात स्वस्त बांगड्यांची लेन, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल