advertisement

Pune News: पीएमपीला गंडवण्यासाठी बनवलं बनावट ॲप, पासही काढला, पण कंडक्टरनं डावच उधळला!पुण्यात झालं काय?

Last Updated:

Pune News: पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या 'पीएमपी'ला (PMPML) गंडवण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणाने चक्क बनावट मोबाईल ॲपच तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीएमपीच्या फुकट प्रवासासाठी लावला होता जीवघेणा जुगाड; एका चुकीने सगळा गेमच फसला,  तरुणाविरोधात गुन्हा दाखल
पीएमपीच्या फुकट प्रवासासाठी लावला होता जीवघेणा जुगाड; एका चुकीने सगळा गेमच फसला, तरुणाविरोधात गुन्हा दाखल
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या 'पीएमपी'ला (PMPML) गंडवण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणाने चक्क बनावट मोबाईल ॲपच तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बनावट ॲपद्वारे मोफत दैनंदिन पास काढून तो बिनदिक्कत प्रवास करत होता. मात्र, सतर्क असलेल्या बस वाहकामुळे हे बनावट अॅपचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML) 'आपली पीएमपीएमएल' नावाचे अधिकृत ॲप आहे. यावरून प्रवाशांना तिकीट आणि पास काढता येतो. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी या ॲपचे सर्व्हर डाऊन झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे कोणत्याही प्रवाशाला तिकीट किंवा पास काढता येत नव्हता. अशातच कौस्तुभ मांजरेकर (वय २४) हा तरुण सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावरून प्रवास करत होता.
advertisement

कसं फुटलं बिंग?

कौस्तुभने बसमधील वाहकाला (कंडक्टर) आपल्या मोबाईलमधील पास दाखवला. मात्र, अधिकृत सर्व्हर डाऊन असताना याला पास कसा मिळाला? अशी शंका सतर्क वाहकाला आली. वाहकाने कसून चौकशी केली असता, कौस्तुभने अधिकृत ॲपसारखंच दिसणारं एक बनावट ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये तयार केल्याचं समोर आलं. या ॲपद्वारे तो बनावट पास दाखवून फुकट प्रवास करत होता.
advertisement

पोलिसांकडून गुन्हा दाखल

हा तरुण उच्चशिक्षित असून त्याने काही दिवसांपूर्वीच हे ॲप तयार केले होते. याप्रकरणी कौस्तुभ मांजरेकर (रा. बालाजीनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहकारनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News: पीएमपीला गंडवण्यासाठी बनवलं बनावट ॲप, पासही काढला, पण कंडक्टरनं डावच उधळला!पुण्यात झालं काय?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement