ग्रामपंचायतीच्या आवारात आणि मोकळ्या जागेत साचणारे पाणी पाहून त्यांनी पुढाकार घेतला. या पाण्याचा अपव्यय थांबवून त्यावर तब्बल 35 ते 40 फळझाडांची लागवड करण्यात आली. केळी, सफरचंद, आंबा, चिकू आणि पपई यांसारखी विविध फळझाडे त्यांनी लावली असून कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने ती जोपासली आहेत. आज ही झाडे फुलून आली असून गावकऱ्यांना ताजी, सेंद्रिय फळे उपलब्ध होत आहेत.
advertisement
53 फळझाडांची लागवड
यापूर्वीही त्यांनी जिल्हा परिषद शाळेत सुमारे 53 फळझाडांची लागवड केली होती. आज ती झाडे मोठी झाली असून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक मधल्या सुट्टीत त्यांची फळे खातात. वाया जाणारे पाणी थांबल्याने परिसरात डासांची उत्पत्ती कमी झाली असून रोगराईवरही आळा बसला आहे. पर्यावरण रक्षणासोबतच आरोग्य आणि सामाजिक जाणीव वाढवणारा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हराळवाडी पॅटर्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.





