advertisement

सायकलची पंक्चर काढायला बाहेर पडली अन् काळानं गाठलं, विद्यार्थिनीसोबत भंयकर घडलं, पंढरपुरात हळहळ

Last Updated:

Pandharpur News: श्रेया गाडे ही कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे बीसीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती मैत्रिणीसह सायकलची पंक्चर काढायला निघाली होती.

सायकलची पंक्चर काढायला गेली अन् काळानं गाठलं, महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत भंयकर घडलं, पंढरपुरात हळहळ
सायकलची पंक्चर काढायला गेली अन् काळानं गाठलं, महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत भंयकर घडलं, पंढरपुरात हळहळ
पंढरपूर: पंढरपूर शहरातील नवीन कराड नाका परिसरात टिप्परच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी पंढरपूर-कराड रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. श्रेया कांतीलाल गाडे (वय 20) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथील आहे. तर तिची मैत्रीण स्नेहा विठ्ठल सवयीसर्जे (वय 18) ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात मृत श्रेया गाडे ही कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे बीसीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. श्रेया नवीन कराड नाका परिसरातील समाजकल्याण वसतिगृहात वास्तव्यास होती. रविवारी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ती व तिची मैत्रीण स्नेहा सवयीसर्जे (राहणार सलगर, तालुका मंगळवेढा) या दोघी सायकल पंक्चर काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.
advertisement
नवीन कराड नाकाहून पंत चौकाच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच 13 EW 7677) टिप्परने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत श्रेया हिचा जागीच मृत्यू झाला, तर स्नेहा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर टिप्पर चालकाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपी चालकाचा शोध घेतला जात आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सायकलची पंक्चर काढायला बाहेर पडली अन् काळानं गाठलं, विद्यार्थिनीसोबत भंयकर घडलं, पंढरपुरात हळहळ
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement