Success Story : उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग? Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ज्ञानेश्वर हिप्परकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी केवळ 10 गुंठे शेतामध्ये उसामध्ये कोबीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे.
सोलापूर : शेती परवडत नाही, अशी ओरड सध्या सगळीकडे ऐकायला मिळत असते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र नवा आदर्श निर्माण केला आहे. ज्ञानेश्वर हिप्परकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी केवळ 10 गुंठे शेतामध्ये उसामध्ये कोबीची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. 40 दिवसांमध्ये कोबीच्या आंतर पिकातून ज्ञानेश्वरांना 90 हजार रुपये मिळणार आहेत तर उसातून 1 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाहूयात प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांची ही यशस्वी शेती.
कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी 10 गुंठ्यामध्ये उसाची लागवड केली आहे. उसाची लागवड केल्यावर शेतामध्ये उरलेल्या मोकळ्या जागेमध्ये आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली होती. 10 गुंठ्यात कोबीची लागवड करण्यासाठी ज्ञानेश्वर हिप्परकर यांना 12 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला होता. एक कोबी दीड ते दोन किलोचा असून सध्या बाजारात 10 ते 15 रुपये किलो दराने एका कोबीची विक्री होत आहे. 40 दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कोबीच्या आंतरपीकातून ज्ञानेश्वर हिप्परकर यांना खर्च वजा करून जवळपास 90 हजार रुपयांचा नफा मिळणार आहे.
advertisement
तसेच 10 गुंठ्यामध्ये ज्ञानेश्वरांनी उसाची देखील लागवड केली आहे तर एका वर्षानंतर 10 गुंठ्यातून 25 टन ऊस निघणार असून या उसातून देखील जवळपास 1 लाख रुपयांचे उत्पन्न हे हिप्परकर यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड जर केली असेल तर मोकळ्या जागेमध्ये कोबी, कोथिंबीर किंवा पालेभाज्यांचे आंतरपीक घेऊन अधिक उत्पन्न कमवता येते असा सल्ला आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 5:39 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग? Video







