advertisement

Soft Breakup Trend : ना भांडण, ना इमोशनल ब्लॅकमेल; जेन झीच्या नव्या ट्रेंडमध्ये असे वेगळे होतात कपल्स!

Last Updated:
Gen Z's new soft breakup trend : जनरेशन झेड म्हणजेच हल्लीची तरुण पिढी आपल्या नातेसंबंधांविषयी खूप मुक्तपणे बोलते. म्हणजे त्यांना काय हवे आहे, काय नको आहे.. याबद्दल त्यांना खूप स्पष्टता आहे. म्हणूनच कदाचित हे लोक प्रत्येक नात्याला एक विशिष्ट व्याख्या देऊ शकतात. आता त्यांचा एक नवा ट्रेंड समोर आला आहे.
1/9
जेन झी कोणाशी नातं जोडायचं याच्यासाठी काही मापदंड ठरवतात. त्यांच्या प्रत्येक अपेक्षेवर खरी उतरणारी व्यक्ती असेल तर ते नात्यात पुढे जातात. काहीवेळा एखादं नातं टिकतं किंवा एखादं टिकत नाही. जे नातं टिकत नाही त्या नात्यातून बाहेर पाडण्यासाठीही एक ट्रेंड आहे, ज्याचे पालन जेन झी करतात.

2/9
नको असलेल्या नात्यातून बाहेर पाडण्यासाठी जनरेशन झेडमध्ये सॉफ्ट ब्रेकअप्सची लोकप्रियता आता वाढते आहे. यामध्ये नको असलेल्या नात्यामधून हळूहळू बाहेर पडतात. बरीच तरुणांच्यामते, यामुळे ताण आणि त्रास कमी होतो. मात्र यामुळे गोंधळ आणि जवळीकता देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे तज्ञांच्यामते, स्पष्ट संवाद यीग्य मार्ग आहे.

3/9
जेन झी नात्यांकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहतात. त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर मानसिक शांती, स्पेस आणि स्वाभिमान देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आधीच्या जनरेशांमध्ये जेव्हा नाती तुटायची तेव्हा भांडणे, ब्लॉक करणं, वाद किंवा सोशल मीडियावर भावनिक पोस्ट अशा गोष्टी व्हायच्या. पण आता 'सॉफ्ट ब्रेकअप्स ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. या ट्रेंडमध्ये अचानक गोष्टी संपवण्याऐवजी हळूहळू दूर राहणे निवडले जाते.

4/9
यादरम्यान आरोप-प्रत्यारोज, रडणं, ओरडणं, न संपणारे वाद असं एकाचीही होत नाही. फक्त संवाद कमी करणं, संपर्क कमी करणं आणि हळूहळू नातं विसरणं.. अशा गोष्टी केल्या जातात. सोशल मीडियावरील बरेच तरुण याला एक मॅच्युअर आणि कमी वेदनादायक पद्धत म्हणत आहेत. मात्र काही लोकांच्यामते, ही गोंधळ उडवणारी आणि भावनिकदृष्ट्या थकवणारी पद्धत आहे.

5/9
सॉफ्ट ब्रेकअप म्हणजे काय : सॉफ्ट ब्रेकअप म्हणजे नातेसंबंध अचानक संपवण्याऐवजी हळूहळू दूर जाणे. तुमच्या जोडीदाराशी संवाद कमी होतो, गप्पा मारण्यास उशीर होतो, बैठकांचे नियोजन पुढे ढकलले जाते आणि भावनिक संबंध कमकुवत होतात. कोणीही अचानक नातेसंबंध संपल्याचे जाहीर करत नाही. उलट एक जोडीदार किंवा कधीकधी दोघेही हळूहळू स्वतःच एकमेकांपासून दूर जातात.

6/9
जेन झी मानसिक आरोग्याबद्दल अधिक जागरूक आहे. ते अनावश्यक भावनिक संघर्ष टाळतात. त्यांच्यासाठी शांतता आणि कमी ताण अधिक महत्त्वाचा आहे. नातं एकदम तोडून समोरच्याला दुखावण्यापेक्षा त्यांना सॉफ्ट ब्रेकअप करणं सोयीचं वाटतं. अनेक तरुणांचा असा विश्वास आहे की हळूहळू वेगळे होणे अचानक ब्रेकअपपेक्षा कमी धक्कादायक आणि त्रासदायक आहे.

7/9
हा खरोखर सर्वोत्तम मार्ग आहे का : काहींसाठी हा दृष्टिकोन सोपा असू शकतो. परंतु तो नेहमीच योग्य नसतो. जेव्हा कोणी स्पष्टपणे सांगत नाही की नातेसंबंध संपत आहेत, तेव्हा दुसरी व्यक्ती नातं टिकेल या आशेवर राहते. ते जोडीदाराच्या बोलण्याची, मेजची वाट पाहत बसू शकतात. यामुळे अनेकदा गोंधळ आणि अतिविचार या समस्याही निर्माण होतात.

8/9
नातेसंबंध तज्ञांचा असा विश्वास आहे की, स्पष्ट संवाद हा प्रत्येक नात्याचा पाया आहे. जर गोष्टी स्पष्ट नसतील तर भावना अडकलेल्या राहतात, आस लागून राहते. कधीकधी सॉफ्ट ब्रेकअपमुळे संबंध पूर्णपणे संपत नाहीत. तुम्ही या परिस्थितीत असाल तर गप्प राहण्यापेक्षा उघडपणे बोलणे चांगले. जोडीदाराला तुम्ही एकत्र आहात की नाही हे स्पष्टपणे विचारा आणि तुम्ही स्वतःच दूर जाऊ इच्छित असाल तर तुमच्या भावना प्रामाणिकपणे समोरच्याकडे व्यक्त करा.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement