IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियासाठी मुंबईतून समोर आली गुड न्यूज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs ENG Rain Prediction : सेमीफायनलमध्ये सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. अशातच आता टीम इंडियासाठी गुड न्यूज समोर आलीये.
advertisement
1/7

आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात फाईट पहायला मिळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
2/7
यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे काही सामने रद्द करण्यात आले होते. अशातच आता सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. अशातच आता टीम इंडियासाठी गुड न्यूज समोर आलीये.
advertisement
3/7
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत 5 मार्च रोजी पावसाची शक्यता 0 टक्के आहे. दिवसभर आकाश पूर्णपणे निरभ्र आणि स्वच्छ राहील, ज्यामुळे मॅचमध्ये कोणताही व्यत्यय येण्याची शक्यता नाही.
advertisement
4/7
या कालावधीत मुंबईतील तापमान साधारणपणे 25 डिग्री सेल्शियस ते 28 डिग्री सेल्शियस च्या दरम्यान असेल. ओलावा किंवा ह्युमिडिटीचे प्रमाण 35 टक्के इतके कमी असल्याने खेळाडूंना आणि प्रेक्षकांना जास्त उकाडा जाणवणार नाही.
advertisement
5/7
वारा उत्तर दिशेकडून 18 Mph वेगाने वाहण्याची शक्यता आहे. हे थंड वारे संध्याकाळच्या वेळी वातावरणात थोडा गारवा निर्माण करतील, ज्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी परिस्थिती उत्तम असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
advertisement
6/7
तुम्हाला माहिती नसेल तर आयसीसीच्या सेमीफायनल मॅचसाठी देखील रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल सामना पावसामुळे 5 मार्च तारखेला खेळला गेला नाही तर तो सामना 6 मार्च रोजी खेळवला जाईल.
advertisement
7/7
दरम्यान, पण 6 मार्च रोजी देखील मॅच झाली नाही तर आयसीसीचा एक नियम आडवा येईल अन् टीम इंडियाला बॅग पॅक करावी लागेल. 6 मार्चला देखील मॅच झाली नाही तर इंग्लंडला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियासाठी मुंबईतून समोर आली गुड न्यूज!