TRENDING:

IND vs ENG : आयसीसीचा एक नियम अन् एकही बॉल न खेळता टीम इंडिया फायनलमधून 'आऊट'? इंग्लंडला लॉटरी!

Last Updated:
India vs England T20 WC Semifinal : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना वानखेडेवर खेळवला जाणार आहे. पण या सामन्यात पाऊस आला तर फायनलमध्ये कोण जाणार? जाणून घ्या
advertisement
1/7
IND vs ENG : आयसीसीचा एक नियम अन् एकही बॉल न खेळता टीम इंडिया फायनलमधून 'आऊट'
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे आता फक्त तीन सामने बाकी आहे. दोन सेमीफायनल सामने आणि एक फायनल सामना. साऊथ अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 तारखेला सामना पार पडणार आहे. तर 5 तारखेला भारत आणि इंग्लंड भिडतील.
advertisement
2/7
टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धचा सेमीफायनल सामना हा येत्या 5 तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. अशातच आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. सुपर 8 मध्ये भारतीय संघाने केलेल्या चुकीचे परिणाम भोगावे लागू शकतात.
advertisement
3/7
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा सेमीफायनल सामना म्हणजे अतितटीचा सामना... पण या सामन्यात पावसाने गोंधळ घातला अन् पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर फायनलमध्ये कोण जाणार? आयसीसीचा नियम काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
advertisement
4/7
तुम्हाला माहिती नसेल तर आयसीसीच्या सेमीफायनल मॅचसाठी देखील रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल सामना पावसामुळे 5 मार्च तारखेला खेळला गेला नाही तर तो सामना 6 मार्च रोजी खेळवला जाईल.
advertisement
5/7
पण 6 मार्च रोजी देखील मॅच झाली नाही तर आयसीसीचा एक नियम आडवा येईल अन् टीम इंडियाला बॅग पॅक करावी लागेल. 6 मार्चला देखील मॅच झाली नाही तर इंग्लंडला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळेल.
advertisement
6/7
आयसीसीच्या नियमानुसार, इंग्लंडने सुपर 8 मध्ये सर्वच्या सर्व 6 पाईंट्स मिळवले होते. तर टीम इंडियाच्या खात्यात 4 पाईंट्स होते. त्यामुळे इंग्लंडला फायनलचं तिकीट मिळेल आणि टीम इंडियाचं स्वप्न धुळीस मिळेल.
advertisement
7/7
दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार, 5 मार्च रोजी मुंबईसाठी हवामान अंदाज आशादायक दिसत आहे. आकाश निरभ्र राहील आणि पाऊस पडणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात आलीये. पण मुंबईचा पाऊस कधीची चकवा देऊ शकतो, याची अंदाज सर्वांनाच आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : आयसीसीचा एक नियम अन् एकही बॉल न खेळता टीम इंडिया फायनलमधून 'आऊट'? इंग्लंडला लॉटरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल