व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशी?
डाळबट्टीसाठी लागणारे पीठ आणि इतर साहित्य सुरुवातीच्या काळात आम्ही विक्री करत होतो. याबरोबरच 2023 मध्ये साधे कवठ स्टॉलवर विकण्यासाठी मुंबई येथे नेले. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात देखील कवठाची विक्री सुरू होती. काही ग्राहकांकडून मागणी करण्यात आली की कवठापासून बनवलेला काहीतरी वेगळा पदार्थ द्या. त्यानंतर कवठ जाम बनवण्याचा आणि विक्री करण्याचा निर्णय घेतला आणि आजच्या घडीला कवठ जामची मोठ्या प्रमाणात किराणा दुकानदार, मॉल, तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री सुरू आहे.
advertisement
उत्पादने कसे तयार होते?
कवठ जाम बरोबरच चहा मसाला, घरगुती विविध भाज्यांसाठी लागणारे मसाले घरी स्वतः तयार करतो. त्यासाठी कच्च्या मटेरियलवर प्रक्रिया केली जाते. कच्चे मटेरियल भाजून घेतल्यानंतर गिरणीमध्ये त्याला दळले जाते. सर्व मसाले तयार झाल्यानंतर त्याची पॅकिंग घरीच केली जाते. या कामासाठी दोन महिला आणि पॅकेजिंग मशीन देखील आहे.
इतर महिलांनी हा व्यवसाय करावा का?
इतर महिलांना कवठ जाम, विविध प्रकारचे मसाले बनवण्याचा व्यवसाय करायचा झाल्यास त्यांनी नक्की या व्यवसायात यावे. स्वतः सर्व कामे शिकून घ्यावीत. सुरुवातीला कमी गुंतवणुकीपासून हा व्यवसाय सुरू करावा. घरातले कामे करून देखील हा व्यवसाय आपण करू शकतो. उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या खर्चासाठी देखील हातभार या व्यवसायामुळे लागतो, असे देखील जाधव यांनी म्हटले आहे.