स्वप्नांचा चक्काचूर...
कृष्णा आणि त्याचे मित्र दोन गाड्यांतून मोठ्या उत्साहात एका रिसॉर्टकडे निघाले होते. तरुण वय, सोबतीला जिवाभावाचे मित्र आणि सणाचा उत्साह पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. भरधाव कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ती कार रस्त्यावर एखाद्या खेळण्यासारखी ४ वेळा उलटली.
गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या कृष्णाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. ज्या हातांनी धुलिवंदन खेळायचं होते, ते हात रक्ताने माखले आणि कृष्णाचा मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडला होता.
advertisement
विहिरीच्या कठड्याने रोखला मोठा अनर्थ, पण कृष्णाला वाचवू शकला नाही!
कार उलटत जाऊन थेट शेतातील एका विहिरीच्या कठड्याला धडकली. जर तो कठडा नसता, तर कार थेट विहिरीत कोसळली असती आणि इतर मित्रांचाही जीव वाचवणं कठीण झालं असतं.
मागून येणाऱ्या थारमधील मित्रांनी धावत जाऊन आपल्या रक्ताळलेल्या मित्रांना बाहेर काढलं, पण कृष्णाची हालचाल तोवर थांबली होती. आपल्या लाडक्या मित्राचा मृतदेह हातात घेताना त्या तरुणांच्या डोळ्यात पाणी होतं, कृष्णा अशी जोरात हाक मारुन रडत होते.
कृष्णाच्या मृत्यूची बातमी समजताच रामतीर्थ परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या घरातून पहाटे कृष्ण हसत-खिदळत बाहेर पडला होता, त्याच घरात आता त्याच्या आई-वडिलांचा हंबरडा काळीज चिरून टाकत आहे.
"पोरा, लवकर येतो म्हणाला होतास, असा अर्ध्यावर सोडून का गेलास?" असा टाहो आईनं फोडला आहे. या अपघातात प्रसाद खोले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत, तर यश पेंढारे आणि दुसरा एक मित्र बीडमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. संपूर्ण जिल्हा आज या तरुणांसाठी प्रार्थना करत आहे.
