उद्या हिंदू वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, 'या' 6 राशींवर बरसणार बाप्पाची कृपा; सर्व इच्छा होणार पूर्ण
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या 5 एप्रिल 2026, रविवार रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील ही कृष्ण पक्षातील चतुर्थी 'विकट संकष्टी चतुर्थी' म्हणून ओळखली जाते
advertisement
1/7

उद्या 5 एप्रिल 2026, रविवार रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील ही कृष्ण पक्षातील चतुर्थी 'विकट संकष्टी चतुर्थी' म्हणून ओळखली जाते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारी ही चतुर्थी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हिंदू वर्षातील पहिली चतुर्थी कोणत्या राशींसाठी लकी ठरणार जाणून घेऊ.
advertisement
2/7
मेष - प्रलंबित कामे पूर्ण होतील: मेष राशीच्या जातकांसाठी उद्याचा दिवस यशोदायी असेल. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल. नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे.
advertisement
3/7
वृषभ - आर्थिक लाभ आणि सुख-समृद्धी: वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस आर्थिक स्थैर्य घेऊन येईल. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांकडून एखादी सुखद बातमी मिळू शकते.
advertisement
4/7
मिथुन - बौद्धिक विकास आणि करिअरमध्ये प्रगती: बुद्धीचा कारक असलेल्या गणपतीची मिथुन राशीवर विशेष कृपा राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीचे योग असून तुमच्या संवादशैलीचा प्रभाव इतरांवर पडेल.
advertisement
5/7
कन्या - व्यवसायात वृद्धी आणि मान-सन्मान: कन्या राशीच्या जातकांना व्यापारात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
advertisement
6/7
वृश्चिक - शत्रूंवर विजय आणि आरोग्य लाभ: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संकष्टी चतुर्थी 'संकटमोचक' ठरेल. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे बाप्पा दूर करतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून सुटका मिळेल.
advertisement
7/7
कुंभ - अचानक धनप्राप्ती आणि नशिबाची साथ: कुंभ राशीच्या जातकांना उद्या नशिबाची भक्कम साथ मिळेल. अचानक धनलाभाचे योग असून नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकता. तुमच्या मनातील एखादी इच्छा उद्या पूर्ण होऊ शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उद्या हिंदू वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, 'या' 6 राशींवर बरसणार बाप्पाची कृपा; सर्व इच्छा होणार पूर्ण