मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिली कादंबरी, त्यावर Netflix बनवणार वेब सीरिज; कोण असणार हिरोईन?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं लिहिलेल्या पुस्तकावर आता वेब सीरिज बनणार आहे. अभिनेत्री सध्या वेब सीरिजच्या कामात बिझी आहे.
advertisement
1/9

ओटीटी </a>विश्वात अनेक नवे प्रयोग सुरू आहेत. नव्या विषयांवर वेब सीरिज येत आहेत. अनेक निर्माते थिएटरपेक्षा ओटीटीवर सिनेमा रिलीज होण्याकडे आपला मोर्चा वळवत आहेत. " width="1600" height="900" /> सध्या ओटीटी विश्वात अनेक नवे प्रयोग सुरू आहेत. नव्या विषयांवर वेब सीरिज येत आहेत. अनेक निर्माते थिएटरपेक्षा ओटीटीवर सिनेमा रिलीज होण्याकडे आपला मोर्चा वळवत आहेत.
advertisement
2/9
अशातच ओटीटीवर एक नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सीरिज एका मराठी अभिनेत्रीनं लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे.
advertisement
3/9
काही दिवसांआधी मराठी अभिनेत्रीनं ही कादंबरी लिहिली. त्यातील स्टोरी इंट्रेस्टिंग होती. जी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मला आवडली. आता ते त्याच्यावर वेब सीरिज तयार करणार आहेत.
advertisement
4/9
ज्या अभिनेत्रीनं ही कादंबरी लिहिली आहे तिच अभिनेत्री या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
advertisement
5/9
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री, मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळी हिच्याबद्दल. प्राजक्ताने लिहिलेल्या Too Good to be True या कादंबरीवर आता थेट नेटफ्लिक्स वेब सिरीज बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मराठी मुलीची ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरील मोठी झेप मानली जात आहे.
advertisement
6/9
व्हरायटी इंडियाच्या अहवालानुसार, या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता कोळी स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ती फक्त अभिनयच नाही तर या प्रोजेक्टची निर्मितीही करणार आहे. या सिरीजचे चित्रीकरण 2026 च्या शेवटी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रोजेक्टविषयीची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.
advertisement
7/9
प्राजक्ता कोळी ही फक्त युट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनच मर्यादित नाही. तर तिने अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रोमँटिक सिरीज Mismatched मधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर Jug Jugg Jeeyo, Sunny Sanskari Ki Tulsi Kumari आणि Single Papa यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
advertisement
8/9
मराठी प्रेक्षकांसाठी खास म्हणजे प्राजक्ताने 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटातून मराठी सिनेमात पदार्पण केले. मराठी शाळांवर आधारित असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटामुळे प्राजक्ताला मराठी प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळाले.
advertisement
9/9
आता तिच्याच कादंबरीवर आधारित वेब सिरीजमध्ये ती स्वतः मुख्य भूमिका साकारणार असल्यामुळे हा प्रोजेक्ट अधिकच खास ठरत आहे. कथानक, तिचा अभिनय आणि नेटफ्लिक्सचा भव्य प्लॅटफॉर्म यामुळे ही सिरीज प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिली कादंबरी, त्यावर Netflix बनवणार वेब सीरिज; कोण असणार हिरोईन?