प्रतीक्षा संपली! 'हे' 7 दिवस 'या' 5 राशींच्या लोकांचं पालटणार नशीब, लागणार लॉटरी; तुमची रास यात आहे का?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी 2026 चा शेवटचा आठवडा ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या चार ग्रहांची युती आहे. तसेच मंगळ आपल्या उच्च राशीत असल्याने 'रुचक राजयोग' तयार झाला आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी 2026 चा शेवटचा आठवडा ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या चार ग्रहांची युती आहे. तसेच मंगळ आपल्या उच्च राशीत असल्याने 'रुचक राजयोग' तयार झाला आहे.
advertisement
2/7
या शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि मकर या 5 राशींवर दिसून येईल. या आठवड्यात या राशींच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील.
advertisement
3/7
मेष: मेष राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या प्रगतीचा आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ उच्च स्थितीत असल्याने तुमचे धाडस वाढेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. जे लोक फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील.
advertisement
4/7
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगातून मार्ग काढाल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने तुमचे ध्येय साध्य करणे सोपे होईल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे योग आहेत.
advertisement
5/7
सिंह: सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा 'गेमचेंजर' ठरू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या मुलांशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
6/7
तूळ: तूळ राशीसाठी हा आठवडा भागीदारीत लाभ देणारा ठरेल. लक्ष्मी नारायण राजयोगाचा तुम्हाला विशेष फायदा मिळेल. नवीन व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल.
advertisement
7/7
मकर: तुमच्याच राशीत ग्रहांची युती असल्याने तुम्हाला या आठवड्यात सर्वाधिक प्रभाव जाणवेल. परदेशी व्यापारातून लाभ मिळेल. आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
प्रतीक्षा संपली! 'हे' 7 दिवस 'या' 5 राशींच्या लोकांचं पालटणार नशीब, लागणार लॉटरी; तुमची रास यात आहे का?