आजचा दिवस ठरणार लकी! 'या' मूलांकांच्या लोकांचं पालटणार नशीब, महादेवाच्या कृपेने हवं ते मिळणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज 15 फेब्रुवारी 2026, महाशिवरात्रीचा पवित्र सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी होणारा ग्रहांचा दुर्मिळ संयोग आणि अंशात्मक स्थिती अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांकांसाठी 'जॅकपॉट' ठरणार आहे.
advertisement
1/7

आज 15 फेब्रुवारी 2026, महाशिवरात्रीचा पवित्र सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या दिवशी होणारा ग्रहांचा दुर्मिळ संयोग आणि अंशात्मक स्थिती अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांकांसाठी 'जॅकपॉट' ठरणार आहे.
advertisement
2/7
अंकशास्त्रात मूलांक 1 ते 9 चे विशेष महत्त्व आहे. महादेव हे विनाशाचे आणि पुनरुज्जीवनाचे देव आहेत. आजच्या महाशिवरात्रीपासून मूलांक 3, 5 आणि 9 असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदलांचे वारे वाहणार असून, त्यांच्यावर शिवाची विशेष कृपा बरसणार आहे.
advertisement
3/7
मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले): मूलांक 3 चा स्वामी 'गुरु' आहे. महाशिवरात्रीपासून तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमची मोठी कामे मार्गी लागतील.
advertisement
4/7
मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले): मूलांक 5 चा स्वामी 'बुध' आहे. शिवकृपेने तुमच्या बुद्धिमत्तेला आणि वाणीला धार येईल. नोकरीत असलेल्यांना मोठी संधी किंवा पदोन्नती मिळू शकते. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. तुमची निर्णयक्षमता अचूक ठरेल, ज्यामुळे मोठा आर्थिक फायदा होईल.
advertisement
5/7
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला जन्मलेले): मूलांक 9 चा स्वामी 'मंगळ' आहे. आजच्या दिवसाचा एकूण अंक 9 असल्याने तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. जमीन-जुमल्याच्या वादातून तुमची सुटका होईल. साहसी निर्णय घेतल्यास यश तुमच्या पाठीशी असेल. कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी महादेवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील.
advertisement
6/7
आर्थिक सुबत्ता आणि वृद्धी: या तीनही मूलांकांच्या व्यक्तींच्या उत्पन्नात बंपर वाढ होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे या काळात परत मिळतील आणि बँक बॅलन्स वाढेल.
advertisement
7/7
कौटुंबिक सौख्य: घरातील वातावरण आनंदी राहील. पती-पत्नीमधील वाद मिटतील आणि मुलांच्या यशाने पालकांचे नाव उज्ज्वल होईल. अविवाहित लोकांच्या विवाहाचे योग जुळून येतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आजचा दिवस ठरणार लकी! 'या' मूलांकांच्या लोकांचं पालटणार नशीब, महादेवाच्या कृपेने हवं ते मिळणार