Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे मासिक राशीभविष्य; मार्च महिन्यात डबल धमाका पण एक गोष्ट!
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Monthly Horoscope: मार्च महिना बहुतेक राशींसाठी संमिश्र फळ देणारा ठरेल. या महिन्यात यश मिळवण्यासाठी कष्ट, संयम आणि योग्य निर्णयांची जोड द्यावी लागेल. महिन्याची सुरुवात अनेकांसाठी सकारात्मक असेल, ज्यामध्ये कुटुंब आणि मित्रांची साथ लाभेल. करिअरमध्ये नवीन संधी आणि व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे मार्च महिन्याचे मासिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/7

मेष - मेष राशीसाठी मार्च महिना संमिश्र असेल. महिन्याची सुरुवात आनंदात होईल आणि घरच्यांची तसेच परदेशात असलेल्या लोकांची चांगली साथ मिळेल. व्यवसायात तुम्हाला हवा तसा नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, पण या काळात तुमच्यातला अहंकार वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या आठवड्यात ऑफिसमधील विरोधकांपासून सावध राहा आणि आपली कामं दुसऱ्यावर सोपवण्याची चूक करू नका. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास थकवणारे असले तरी फायदेशीर ठरतील.
advertisement
2/7
मेष - महिन्याच्या मध्यात मुलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या काळजीने मन थोडे अस्वस्थ राहील, पण लवकरच हे प्रश्न सुटतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील, फक्त घाईत निर्णय घेऊ नका. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे जोडीदाराशी संवाद ठेवा. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
advertisement
3/7
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना मार्चच्या सुरुवातीला आरोग्य आणि नात्यांकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. जुने आजार पुन्हा डोकं वर काढू शकतात. घरामध्ये एखाद्या सदस्याशी वाद झाल्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. व्यवसायात स्पर्धेचा मोठा सामना करावा लागेल, पण दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने घरगुती वाद मिटतील. करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील.
advertisement
4/7
वृषभेच्या लोकांना महिन्याच्या मध्यात नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल, पण तरीही तुमचं समाधान होणार नाही आणि तुम्ही अजून प्रगती करण्यासाठी धडपडाल. विनाकारण होणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडू शकतं. कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टींचा बाऊ करू नका आणि दबावाखाली कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. महिन्याचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा जास्त चांगला आणि फायदेशीर असेल. प्रेमसंबंधात मात्र जोडीदाराच्या भावनांचा मान राखा, अन्यथा दुरावा वाढू शकतो.
advertisement
5/7
मिथुन - मिथुन राशीसाठी मार्च महिना नवीन संधी आणि नवीन आव्हाने घेऊन येईल. महिन्याच्या सुरुवातीला कामासाठी छोटे किंवा मोठे प्रवास करावे लागतील, जे फायदेशीर ठरतील. वेळेचं आणि ऊर्जेचं नियोजन नीट केलंत तर यश नक्की मिळेल. घरात धार्मिक कार्ये होतील आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. पर्यटनाचे योगही आहेत. पण विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकतं. दुसऱ्या आठवड्यात विरोधक कामात अडथळे आणतील, पण तुम्ही तुमच्या बुद्धीने त्यावर मात कराल. महिन्याच्या मध्यात कामाचा व्याप खूप वाढेल आणि कष्टाच्या मानाने फळ थोडे कमी मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होऊ शकतात. महिन्याचा उत्तरार्ध मात्र खूप अनुकूल असेल. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि विविध मार्गांनी पैसा येईल. प्रेमसंबंधांसाठी सुरुवातीचा काळ चांगला आहे, पण मधल्या काळात काही कारणांमुळे जोडीदाराशी भेट होऊ शकणार नाही. हाडं आणि पोटाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
6/7
कर्क - कर्क राशीसाठी मार्चची सुरुवात थोडी आव्हानात्मक असेल. घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्यांमुळे तुमची ओढाताण होईल आणि मदतीसाठी कोणाकडे बघण्यापेक्षा स्वतःलाच सगळं हाताळावं लागेल. सुरुवातीला अडचणी असल्या तरी तुम्ही तुमच्या चातुर्याने त्या सोडवाल. महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. या काळात आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर ताबा ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा थोडा कमी नफा मिळेल, पण प्रगती सुरू राहील. उत्तरार्ध मात्र खूप फायदेशीर असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील.
advertisement
7/7
कर्क - राजकारणातील लोकांना मोठे पद किंवा मान मिळू शकतो. परदेशात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. प्रेमसंबंधांतील सुरुवातीचे गैरसमज दूर होऊन जोडीदारासोबतचा विश्वास वाढेल. वैवाहिक जोडीदारासोबत तीर्थयात्रेचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे मासिक राशीभविष्य; मार्च महिन्यात डबल धमाका पण एक गोष्ट!