ग्रहण संपले तरी टाळणार नाही संकट! सूर्याचं नक्षत्र परिवर्तन बिघडवणार खेळ, 4 राशींच्या वाढणार अडचणी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज 2026 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागलं आहे. वर्षातील पहिली ही खगोलीय घटना संपल्यानंतर त्याचे ज्योतिषशास्त्रीय परिणाम दिसून येणार आहेत.
advertisement
1/7

आज 2026 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागलं आहे. वर्षातील पहिली ही खगोलीय घटना संपल्यानंतर त्याचे ज्योतिषशास्त्रीय परिणाम दिसून येणार आहेत. ग्रहांचा राजा सूर्य हा सूर्यग्रहणाच्या एक दिवसानंतर म्हणजेच 19 फेब्रुवारी 2026 रोजी धनिष्ठा नक्षत्रातून बाहेर पडून राहूच्या अधिपत्याखाली असलेल्या 'शतभिषा' नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
advertisement
2/7
राहू हा मायावी आणि अस्थिरतेचा ग्रह मानला जातो, तर सूर्य हा सत्ता आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. जेव्हा सूर्य राहूच्या नक्षत्रात येतो, तेव्हा त्याची शुभ फळे देण्याची शक्ती कमी होते. यामुळे काही विशिष्ट राशींच्या जातकांसाठी येणारा काळ संघर्षाचा आणि आव्हानात्मक ठरू शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार जाणून घेऊ.
advertisement
3/7
शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू असून सध्या राहू स्वतः कुंभ राशीत विराजमान आहे. सूर्य आणि राहू यांच्यातील शत्रुत्वामुळे या नक्षत्र परिवर्तनाला ज्योतिषशास्त्रात 'संताप योग' किंवा संघर्षाचा काळ मानले जाते. या काळात व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो आणि विनाकारण भीती किंवा संशयाचे वातावरण निर्माण होते. विशेषतः ज्यांच्या पत्रिकेत सूर्य किंवा राहू कमकुवत आहे, त्यांना या काळात मानसिक आणि शारीरिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
4/7
कर्क - आर्थिक चढ-उतार: कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन आव्हानात्मक असेल. धनसंचय करण्यात अडचणी येतील. गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबात पैशांच्या कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
कन्या - आरोग्याच्या तक्रारी: कन्या राशीच्या जातकांना या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. डोळ्यांचे विकार, डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्या जाणवू शकतात. कामाच्या अतिताणामुळे मानसिक थकवा येईल. या काळात कोणालाही पैसे उधार देणे टाळावे.
advertisement
6/7
वृश्चिक - करिअरमध्ये अडथळे: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण कामाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण करू शकते. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेऊन जाण्याची भीती आहे. नवीन प्रकल्पाची सुरुवात सध्या तरी पुढे ढकलावी.
advertisement
7/7
मीन - मानसिक तणाव आणि भीती: मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिकरीत्या अस्वस्थ करणारा असू शकतो. अज्ञात भीती किंवा चिंतेमुळे झोप कमी होईल. घरातील सुख-शांती बिघडण्याची शक्यता असून जोडीदारासोबत छोटे छोटे वाद विकोपाला जाऊ शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ग्रहण संपले तरी टाळणार नाही संकट! सूर्याचं नक्षत्र परिवर्तन बिघडवणार खेळ, 4 राशींच्या वाढणार अडचणी