TRENDING:

यंदाची अक्षय तृतीय ठरणार खास! या दिवशी बनतोय 'पॉवरफुल' योग, 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

Last Updated:
यंदाची अक्षय तृतीय अत्यंत खास असणार आहे. यावर्षी 19 एप्रिल 2026 रोजी 'अक्षय तृतीया' साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. मात्र, यावेळची अक्षय तृतीया विशेष ठरणार आहे, कारण या दिवशी चंद्र आणि गुरु यांच्या युतीतून अत्यंत शुभ असा योग निर्माण होत आहे.
advertisement
1/7

2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग तीन राशींच्या लोकांच्या जीवनात धन, समृद्धी आणि आनंद घेऊन येईल. तसेच, करिअरमध्ये मोठी प्रगती आणि भरघोस कमाईचे संकेतही मिळत आहेत.
advertisement
3/7
गजकेसरी योगाचे महत्त्व: जेव्हा कुंडलीत गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्र स्थानी किंवा युतीत असतात, तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. 'गज' म्हणजे हत्ती आणि 'केसरी' म्हणजे सिंह. या योगामुळे व्यक्तीला समाजात मान-सन्मान, अपार धनदौलत आणि राजकीय लाभ मिळतात. अक्षय तृतीयेला हा योग असणे म्हणजे जॅकपॉटच.
advertisement
4/7
मेष - नशिबाची भक्कम साथ आणि धनलाभ: मेष राशीच्या जातकांसाठी हा योग भाग्योदयाचा ठरेल. तुमच्या राशीत गुरु आणि चंद्राची विशेष स्थिती असल्यामुळे रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. सोन्या-चांदीत केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा परतावा देऊन जाईल.
advertisement
5/7
तूळ - करिअरमध्ये मोठी झेप आणि सन्मान: तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग करिअरमध्ये सुवर्णसंधी घेऊन येईल. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीचे प्रबळ संकेत आहेत. तुमच्या बौद्धिक कौशल्यामुळे तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल. जे लोक राजकारण किंवा प्रशासकीय सेवेत आहेत, त्यांना मोठे पद मिळू शकते.
advertisement
6/7
धनु - आर्थिक विवंचना दूर होईल: धनु राशीचा स्वामी स्वतः गुरु आहे. अक्षय तृतीयेला होणारा हा योग तुमच्यासाठी धनाचा वर्षाव करणारा ठरेल. जुन्या कर्जातून तुमची सुटका होऊ शकते. अचानक धनप्राप्तीचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मालमत्तेशी संबंधित वादात तुमचा विजय होईल.
advertisement
7/7
19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 50 मिनिटांपासून तृतीया तिथी सुरू होत आहे. गजकेसरी योगाच्या प्रभावामुळे या दिवशी सोने, चांदी, घर किंवा वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ ठरेल. या खरेदीमुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील, अशी धार्मिक मान्यता आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
यंदाची अक्षय तृतीय ठरणार खास! या दिवशी बनतोय 'पॉवरफुल' योग, 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल