Rashi Bhavishya In Marathi: सुकर्मा, घृति योगात या राशींना मिळणार भाग्याची साथ; आजचं राशिभविष्य 21 मार्च 2024
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य ( 21 मार्च 2024)..
advertisement
1/12

मेष (Aries) : दिवस आनंददायी असेल. विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी समजेल. त्यामुळे ते आनंदी असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. लव्ह लाईफमध्ये काही वाद सुरू असेल तर संपुष्टात येईल. लव्ह लाईफमध्ये आनंद मिळेल. तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत मौजमजा कराल. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना घेऊन देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्री जाल. सामाजिक संस्थांशी संबंधित लोकांच्या कार्याचे कौतुक होईल.Lucky Color : orange Lucky Number : 14
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : कौटुंबिक जीवनात काही महत्त्वपूर्ण बदल दिसतील. अर्थात हे बदल चांगले असल्याने तुम्ही आनंदी रहाल. पण हे बदल कुटुंबातील एखाद्या सदस्याला चुकीचे वाटू शकतात. प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला घ्यावा. मित्रांशी संवाद साधताना बोलण्यात गोडवा ठेवा अन्यथा ते दुखावले जातील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.Lucky Color : Red Lucky Number : 9
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : तुम्हाला आज सकारात्मक ऊर्जा जाणवेल. नोकरदार व्यक्तींना बहुप्रतिक्षित अशी एखादी चांगली संधी मिळू शकते. ज्या व्यक्ती विवाहेच्छुकांना अजून काही काळ समस्यांचा सामना करावा लागेल. त्यानंतर त्यांना विवाहासाठी एखादा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. तुम्हाला पूर्वी केलेल्या एखाद्या चुकीबद्दल कुटुंबातील सदस्याची माफी मागावी लागेल.Lucky Color : Pink Lucky Number : 8
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवस मध्यम फलदायी असेल. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत आजोळी नातेवाईकांना भेटायला जाल. तिथे तुम्हाला एखादं सरप्राईज मिळू शकतं. ऑफिसमध्ये एखादी छोटी पार्टी आयोजित केली जाईल. तुमची प्रगती पाहून शत्रूंना हेवा वाटेल. त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. जोडीदारासोबत काही वेळ एकांतात घालवाल. त्यामुळे तुमच्यात असलेले वाद मिटतील. तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी काही पैसे खर्च कराल.Lucky Color : Yellow Lucky Number : 11
advertisement
5/12
सिंह (Leo) : वैवाहिक जीवन आनंददायी असेल. तुम्ही तुमच्या पालकांशी कौटुंबिक समस्यांवर चर्चा कराल. यासाठी तुम्हाला तुमच्या भावांचा सल्ला घ्यावा लागेल. जर तुम्ही प्रवासाला जाण्याचं नियोजन करत असाल तर थोडी सावधगिरी बाळगा. कारण प्रवासात अपघाताचा धोका आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज सार्वजनिक सभा किंवा मेळावा घेण्याची संधी मिळेल. तुमच्या राजकीय कार्याचं कौतुक होईल. कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.Lucky Color : Blue Lucky Number : 5
advertisement
6/12
कन्या (Virgo) : वाढता खर्च चिंतेत रहाल. खर्चाबाबत तुम्ही तुमच्या मित्रांचा सल्ला घेऊ शकता. पण काही गोष्टींवर नाईलाजाने खर्च करावाच लागेल. तसेच बजेटचं योग्य नियोजन करावं लागेल. तरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बजेटचं नियोजन न केल्यास तुमची बचत कमी होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मुलांक़डून एखादी चांगली बातमी समजेल. तुम्हाला अध्यात्मात रूची वाटेल. संध्याकाळी जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल.Lucky Color : Maroon Lucky Number : 17
advertisement
7/12
तूळ (Libra) : दिवस प्रगतीचा असेल. व्यावसायिकांना नवीन संधी मिळेल. योग्य संधी ओळखून त्यानुसार काम केल्यास पैसे कमवू शकाल. तुम्हाला रखडलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. मुलांच्या इच्छा पूर्ण कराल. तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणातील अडचणी सोडवण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. भविष्यासाठी बचत करण्याकरिता एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.Lucky Color : Purple Lucky Number : 18
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस व्यस्तता वाढवणारा असेल. सकाळपासून व्यवसायातील कामात व्यस्त रहाल. त्यामुळे तुम्हाला इतर कामांकडे लक्ष देता येणार नाही. पण ही गोष्ट टाळा. कामांकडे दुर्लक्ष केल्यास एखादं कायदेशीर काम रखडू शकतं. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय आनंदी असतील. संध्याकाळी ऑफिसमधील सहकाऱ्यांसह एखादी पार्टी आयोजित कराल. लहान व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्याने ते आनंदी असतील. तुमचा शेजाऱ्यांशी कोणत्याही कारणावरून वाद झाला तर त्यावेळी मौन बाळगणं तुमच्यासाठी फायदेशीर असेल.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : धार्मिक, अध्यात्मिक गोष्टीत रस वाढेल. पण तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागेल अन्यथा तेथे तुमचे शत्रू तुमचं मोठं नुकसान करू शकतात. तुम्ही तुमच्या समस्या वडिलांशी शेअर कराल. यातून तुम्हाला समस्यांवर उपाय मिळू शकेल. संध्याकाळी मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ रहाल. तुम्ही जोडीदारासोबत सासरच्या लोकांशी समेट करण्यासाठी जाऊ शकता. पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी पुरेशी काळजी घ्या अन्यथा अडचणी वाढू शकतात.Lucky Color : White Lucky Number : 3
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत चांगले रिझल्ट मिळतील. व्यवसाय अचानक वाढल्याने आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे तुमची आर्थिक बाजू सक्षम होईल. तुमचा भाऊ नवीन घर, दुकानाच्या खरेदीचे नियोजन करत असले तर तुम्हाला त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल. आज त्याची इच्छा पूर्ण होईल आणि त्याला तुमच्या मदतीमुळे नवीन मालमत्ता मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. ऑफिसमध्ये या पूर्वी केलेल्या कामाचं कौतुक होईल.Lucky Color : Black Lucky Number : 6
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत प्रवास करता येईल. कौटुंबिक जीवनातील समस्यांवर उपाय मिळतील. तुम्हाला एकटेपणा जाणवेल. कारण कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला वेळेवर मदत मिळणार नाही. तुमचे मनोबल कमकुवत होईल. इतरांना मदत करण्यापूर्वी लोक त्यास तुमचा स्वार्थ समजणार नाहीत याची काळजी घ्या अन्यथा नंतर लोकांचे टोमणे ऐकावे लागतील.Lucky Color : Burgundy Lucky Number : 8
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज तब्येत बिघडू शकते. त्यामुळे बाहेरचे किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळा अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित त्रास जाणवेल. शासकीय नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मैत्रिणीच्या मदतीनं आर्थिक लाभ मिळेल. ऑफिसमध्ये शत्रू तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सावध रहा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर त्यांना परीक्षेत यश मिळेल. जुन्या मित्राला भेटून आनंद वाटेल.Lucky Color : Navy Blue Lucky Number : 19
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Rashi Bhavishya In Marathi: सुकर्मा, घृति योगात या राशींना मिळणार भाग्याची साथ; आजचं राशिभविष्य 21 मार्च 2024