Astrology: संकटात कोणी हात दिला नाही! या राशींचे आता नशीब उजळणार; भाग्योदय जवळ आलाय
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 18, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
advertisement
1/12

मेष (Aries) : तुम्ही आज आणि ऊर्जेने भरलेले असाल. आज तुमच्या कल्पना तुम्ही एकदम स्पष्टपणे मांडाल त्यामुळे तुमच्या सभोवतालच्या माणसांना त्या समजतील. वैयक्तिक नात्यांमध्ये प्रेम वाढवा जुने वाद संपवण्यासाठी हा योग्य काळ आहे. तुम्ही जर नवीन प्रोजेक्टवर काम करणार असाल तर तुमच्या कल्पनेतून काहीतरी अद्वितीय साध्य होऊ शकतं. मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. आणि ध्यान यामुळे ऊर्जा होईल. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला आहे योग्य दिशेने चालत रहा.Lucky Color : YellowLucky Number : 9
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : तुमच्यासाठी आजचा दिवस समर्पित भावनेने कष्ट करण्याचा आहे. तुमच्या कामांमध्ये प्रामाणिकपणे आणि सातत्याने पुढे जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तुम्हाला आज काही आव्हानांचा सामना करावा लागला तरीही सकारात्मकता आणि कष्ट या बळावर तुम्ही यश मिळवाल. कुटुंबीयांबरोबर वेळ घालवल्यामुळे मनःशांती मिळेल. कमी खर्च करा. जुना मित्र भेटल्याने ताजेतवाने व्हाल आणि मरणरंजनात रमून जाल. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज व्यायाम करायला विसरू नका. ध्यान केल्यामुळे मानसिक संतुलन चांगलं राहील. एकूण तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करून आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत रहा.Lucky Color : RedLucky Number : 12
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आज तुमच्याकडे अनेक संधी चालून येणार आहेत तुमचा फोटो यांच्या जोरावर तुम्ही नव्या कल्पना आणि कौशल्य विकसित करू शकाल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणं हिताचं ठरेल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर घालवलेला वेळ नाती दृढ करेल, तसंच नवे मित्र जोडायला मदत करेल. व्यवसायात काही जुन्या प्रकल्पांवर पुन्हा एकदा लक्ष द्यावं, असं वाटेल. खासगी आयुष्यात जोडीदाराशी स्पष्टपणे बोलण्याची वेळ आली आहे. समजुतीने घेतल्यास अधिक चांगलं होईल आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस शक्यतांचा आहे, संधींचा आहे. त्याचा फायदा घ्या.Lucky Color : OrangeLucky Number : 4
advertisement
4/12
कर्क (Cancer) : सध्या तुम्ही भावना आणि संवेदना यातील समतोल राखू शकाल असे दिवस आहेत. कुटुंबियांबरोबर वेळ घालवल्यास आनंद होईल आणि नाती दृढ होतील. कामाबाबत आपल्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करा. थोडे कष्ट केल्यास यश लवकरच मिळणार आहे. कठीण काय आला तरीही धैर्याने आणि सकारात्मकतेने काम करत रहा. मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या ध्यान आणि योगा करून शांतता मिळावा. स्क नवे प्लॅन तयार करण्यासाठी आकार चांगला आहे तुमच्या मनाला वाटेल तसं वागा आनंद मिळेल.Lucky Color : MaroonLucky Number : 10
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज तुमचा आत्मविश्वास वाढल्याने तुम्हाला अडचणींचा सामना करायला बोल मिळणार आहे. सामाजिक जीवनात आधार मिळेल. तुमची क्रिएटिव्हिटी आज उच्चीला असणार आहे, त्यामुळे नवीन प्रकल्प किंवा एखाद नव चित्र काढायला आज सुरुवात करू शकता. ऑफिसमध्ये तुमच्या विचारसरणीबद्दल मत मांडायला आज संधी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. आहार व्यवस्थित घ्या व्यायाम करा. जोडीदाराशी स्पष्टपणे बोला. आज सकारात्मक ऊर्जेचा फायदा घ्या.Lucky Color : BlueLucky Number : 14
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज तुम्ही जरा गंभीर असाल आणि कामावरच लक्ष केंद्रित करा. सातत्यपूर्ण आणि प्रगतिशील काम करण्याचा तुमचा मानस असल्याचं लक्षात येत आहे. जर आज जवळच्या व्यक्तींबरोबर वेळ घालवावासा वाटत असेल तर तसं करा आनंद मिळेल. ध्यान, योग याने मानसिक शांतता मिळेल. पैसे खर्च करताना विचारपूर्वक करा. सार्वजनिक कार्यक्रमात ओळखी होतील. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहा.Lucky Color : WhiteLucky Number : 7
advertisement
7/12
तूळ (Libra) : तुमच्याभोवतीची ऊर्जा चांगली असल्यामुळे नात्यांना वेळ देऊन ति दृढ करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा आणि वागण्यातून मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा दिसू द्या. ऑफिसमध्ये काही अडचणी आव्हान येण्याची शक्यता आहे पण हुशारी आणि योग्य दृष्टिकोनामुळे तुम्ही त्यावर मात कराल. यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. बजेट तयार करा. महाराष्ट्रिक आरोग्याकडे लक्ष द्या. ताणापासून मुक्त होण्यासाठी स्वतःला वेळ द्या नात्यामध्ये तुमच्या भावना व्यक्त करण फायद्याचं ठरेल. जोडीदाराला वेळ द्या.Lucky Color : BlueLucky Number : 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येत असल्याचे जाणवेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी संवाद साधणं फलदायी ठरेल. तुमच्या मनातील भावनांवर लक्ष केंद्रित करायला योग्य वेळ आहे. जर तुम्हाला कुटुंबामध्ये तणाव जाणवत असेल तर स्पष्टपणे बोलण्याची हीच वेळ आहे. व्यायाम आणि साधा आहार हितकारी ठरेल. सार्वजनिक कामात आनंद मिळेल. इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल. तुमच्या जगण्याला वेगळं वळण देणार् या एका बदलासाठी तयार रहा. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, शंका टाळा आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करा.Lucky Color : MagentaLucky Number : 6
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहामुळे आव्हानांचा सामना करू शकाल. ऑफिसमध्ये तुमच्या कष्टांची दखल घेतली जाईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहिल्याने टीमवर्कमध्ये उपयोग होईल. कुटुंबीयांबरोबर एखादा सण किंवा आनंदाची घटना साजरी करण्याचा विचार कराल. मानसिक आरोग्याकडे लक्ष दिल्याने उत्साह वाढेल. आवर्जून विश्रांती घ्या. एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करण्यासाठी किंवा छंद जोपासण्यासाठी हा काळ चांगला आहे. स्वतः विश्वास ठेवा आनंदात राहा.Lucky Color : BrownLucky Number : 2
advertisement
10/12
मकर (Capricorn) : तुम्ही ऑफिसमध्ये घेतलेले कष्ट आणि समर्पणभावना याचं फ आज मिळेल प्रगती होईल. सहकार्यांशी नातं सुधारल्याने असाईनमेंट वेळेत पूर्ण कराल. आर्थिक दृष्ट्या काळजी घ्या. बचतीला प्राधान्य द्या. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे. नाती बळकट करा. आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवल्याने मनाला शांतता मिळेल. व्यायाम आणि योग्य आहाराने आरोग्य नीट राखा. सकारात्मकतेने आजचा दिवस आनंदात जाईल.Lucky Color : PinkLucky Number : 11
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : तुमची क्रिएटिव्हिटी आज उच्चीला असणार आहे त्यामुळे तुमच्या कामात एक नव चांगलं वळण्याची शक्यता आहे. जुनी प्रोजेक्ट पुन्हा सुरू करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे विचारांना चालना मिळेल. मित्र आणि कुटुंबीयांबरोबर घालवलेला वेळ आनंद देईल, समाधान देईल. जवळच्या व्यक्तींच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत केल्यास नाती दृढं होतील. विश्रांती घ्या. सात गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य नाही. त्या मुळे काळजीपूर्वक गुंतवणूक करा. मोठा निर्णय घेण्यापूर्वी नयोजन करण्यास विसरू नका. तुमच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी सकारात्मकतेने प्रयत्न करत रहा.Lucky Color : GreenLucky Number : 8
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज अनेक बाबतीत समृद्धीचा अनुभव घ्याल. आत्मपरीक्षण करून भावनिक गोष्टींबद्दल अधिक जाणून घ्याल. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला जाणून घेऊन पुढे जाणं हिताचं ठरेल. व्यवसायामध्ये नवीन संधी सापडतील. तुमची क्रिएटिव्हिटी आता नव्या उंचीला जात आहे. मित्र आणि कुटुंबियांना वेळ देण्याचा प्रयत्न करा ते महत्त्वाचे आहे. नवी नाती जोडली जातीलजी भविष्यात उपयोगी पडतील. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. तुमचं अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे त्यामुळे सकारात्मकतेने त्या मार्गावर चालत रहा तुमची इच्छा पूर्ण होईल आणि स्वप्नही साकारतील.Lucky Color : Sky BlueLucky Number : 11
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: संकटात कोणी हात दिला नाही! या राशींचे आता नशीब उजळणार; भाग्योदय जवळ आलाय