'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त डिझेल ऑटोमॅटिक SUV! 24KMचं जबरदस्त मायलेज, किंमत फक्त...
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Best Diesel Automatic SUVs Under 15 Lakh in India: आता डिझेल ऑटोमॅटिक एसयूव्ही खरेदी करणे पहिल्यापेक्षा जास्त सोपं झालंय. आज आपण कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या डिझेल ऑटोमेटिक कारविषयी जाणून घेणार आहोत. चला पाहूया लिस्ट...
advertisement
1/10

Kia Seltos: ही एक मिड-साइज एसयूव्ही आहे. मात्र याचे काही लोअर डिझेल व्हेरिएंट्स (जसंकी HTK+ iMT या ऑफ-रनिंग डिस्काउंट्ससह AT) 15 लाख रुपयांच्या बजेटच्या आसपास येऊ शकतात. ज्या लोकांना कॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षा एक मोठी आणि जास्त प्रीमियम कार हवी आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट ठरते.
advertisement
2/10
सेल्टोसचं इंटीरियर खुपच प्रीमियम आहे. यात 1.5-लिटरचं CRDi VGT डिझेल इंजिन मिळतं. या कारच्या डिझेल AT व्हेरिएंटची किंमत 11.81 लाखांपासून सुरू होते. यात पॅनोरमिक सनरूफ आणि ड्यूअल-झोन क्लायमेट कंट्रोलसारखे मोठ्या सेगमेंटचे फीचर्स मिळतात.
advertisement
3/10
Mahindra XUV 3XO: ही एसयूव्ही आपल्या बोल्ड डिझाइन आणि दमदार मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. या कारच्या डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट्सची किंमत 10.85 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात रूंद आहे. ज्यामुळे यात मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना खुप स्पेस मिळतो.
advertisement
4/10
या कारमध्ये 1.5 लिटर डर्बो डिझेल इंजिन मिळतं. जे 117 PS पॉवर आणि 300 Nm टॉर्क देते. ज्यामुळे ही कार खुप मजेदार ठरते. यामध्ये 6-स्पीड ऑटोशिफ्ट+ (AMT) गियरबॉक्स दिलाय. सेफ्टीसाठी यात 6 एयरबॅग्स स्टँडर्ड मिळतात. लेव्हल-2 ADAS मुळे ही कार आपल्या सेगमेंटची सर्वात सुरक्षित कार ठरते.
advertisement
5/10
Tata Nexon: ही कार भारतातील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्हीमधून एक आहे. या कारच्या डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट(Pure S AMT)ची किंमत 10.54 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला दणकट आणि सुरक्षित कार हवी असेल तर नेक्सन तुमची पहिली पसंत ठरू शकते. या कारचे मस्कुलर लूक आणि हाय ग्राउंड क्लीयरेन्स भारतीय रस्त्यांसाठी परफेक्ट आहे.
advertisement
6/10
नेक्सनमध्ये 1.5- लिटर रेवोटॉर्क डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 115 PS ची पॉवर आणि 260 Nm टॉर्क देते. यात 6-स्पीड एएमची गियरबॉक्स मिळतो. जो kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्याचा दावा करते. यात 360-डिग्री कॅमेरा, व्हॉइस असिस्टेड सनरूफ आणि शानदार JBL साउंड सिस्टम सारखे फीचर्स मिळतात. ज्यामुळे प्रवास आरामदायक होतो.
advertisement
7/10
Kia Sonet: ही कार सेगमेंटच्या सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक आहे. नुकतीच कंपनीने यासाठी नवीन परवडणाऱ्या डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट्स (HTE (O) आणि HTK (O) लॉन्च केल्याय. ज्याची सुरुवातीची किंमत आता 9.78 लाख रुपये (एक्स-शोरुम) पासून सुरू होते. ज्या लोकांना कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स हवे आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
8/10
सोनेट कारमध्ये 1.5 लिटरचं डिझेल इंजन मिळतं. हे इंजिन 116 PS ची पॉवर आणि 250 Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 6-स्पीड टार्क कन्व्हर्टर ऑटोमेटिक गियरबॉक्स दिलंय. फीचर्सच्या बाबतीत यात 10.25-इंचाचे टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ADAS लेव्हल-1 सारखे मॉडर्न फीचर्स मिळतात. ज्यामुळी ही कार एक व्हॅल्यू-फॉर-मनी पॅकेज ठरते.
advertisement
9/10
Hyundai Venue: ही कार आपल्या स्मूथ ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स आणि अनेक फीचर्ससाठी ओळखली जाते. या कारच्या डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट्सची किंमत 11.81 लाख रुपये (एक्स-शोरुम) पासून सुरू होते. ही कार शहरात चालवण्यासाठी खुपच सोपी आहे. हुंडईच्या सर्व्हिस नेटवर्कमुळे ती विश्वासार्ह ऑप्शन ठरते.
advertisement
10/10
वेन्यूमध्ये 1.5 - लिटर डिझेल इंजिनसह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गियरबॉक्सही मिळतो. जे 116 PS ची पॉवर देतो. यात हुंडईची 'ब्लूलिंक' कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी मिळते. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या कारचे अनेक फीचर्स कंट्रोल करू शकता. यासोबतच यात इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट आणि एयर प्यूरीफायरसारखे लग्जरी फीचर्सही मिळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त डिझेल ऑटोमॅटिक SUV! 24KMचं जबरदस्त मायलेज, किंमत फक्त...