बांधकाम कामगाराच्या मुलाला 49 लाखांचं पॅकेज, झोपडपट्टीतला अंबादास जाणार जपानला
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रातील एका बांधकाम कामगाराच्या मुलाला जपानमध्ये तब्बल 49 लाखांचं पॅकेज मिळालं आहे. पाहा कशी घेतली भरारी?
advertisement
1/7

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिस्थिती कधीही अडथळा ठरू शकतं नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तुम्ही कितीही अशक्यप्राय वाटणारं यश खेचून आणू शकता. हेच जालना जिल्ह्यातील परतुरचा बांधकाम कामगाराचा मुलगा अंबादास म्हस्के याने सिद्ध करून दाखवलंय.
advertisement
2/7
झोपडपट्टीत राहणाऱ्या अंबादास म्हस्के यानं मोठं यश मिळवलंय. जपानमधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत डेटा अनॅलिस्ट म्हणून त्याला नोकरी मिळालीय. विशेष म्हणजे अंबादासला वार्षिक 49 लाखांचं पॅकेज मिळालंय.
advertisement
3/7
म्हस्के कुटुंब परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात एका पत्र्याच्या घरात राहते. घरात मोजकं सामान आहे. अंबादासने भाजीपाल्याच्या क्रेटवर फळ्या टाकून त्याचा टेबल म्हणून अभ्यासासाठी वापर केला. या मुलांचा सांभाळ वृध्द आजी करते. तर आई वडील दोघेही मुंबई येथे बांधकाम मजूर म्हणून काम करतात.
advertisement
4/7
एम.टेक 'तंत्रज्ञान आणि विकास' या विषयात त्याने सरस कामगिरी करत रजत पदक मिळविले आहे. आयआयटी मुंबईच्या पदवीदान समारंभात नुकत्याच त्याचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे पदवी मिळण्यापूर्वीच जपानच्या नामांकित होंडा कंपनीत त्याला 49 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी देखील मिळाली आहे.
advertisement
5/7
येत्या 29 सप्टेंबर रोजी अंबादास जपानला जाणार असून 1 ऑक्टोबर पासून नोकरीवर रुजू होणार आहे. त्याचा व्हिसा देखील कंपनीने नुकताच पाठवला आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या, आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असणाऱ्या अंबादासने जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
6/7
आपल्या यशाचे गमक सांगताना त्याला आर्थिक, मानसिक पाठबळ देणाऱ्या परिवार, मित्र मैत्रिणी आणि गुरुजनांचा अंबादास विशेष उल्लेख करतो. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, कोणतीही अडचण तुम्हाला यशापासून दूर ठेवू शकत नाही. माझे यश हे एकट्याचे नाही. कायम सकारात्मक ऊर्जा देणारे आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, माझे शिक्षक, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांचे हे यश आहे, असे तो सांगतो.
advertisement
7/7
माझ्या मुलाने जे यश संपादन केले, त्यामुळे आम्हा सर्वांची मान गर्वाने उंचावली आहे. त्याने आमच्या कुळाचा उद्धार केला. आम्ही सर्व त्याच्या पाठीशी सतत होतो, अशा भावना अंबादासचे आई वडील आणि आजी व्यक्त करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
बांधकाम कामगाराच्या मुलाला 49 लाखांचं पॅकेज, झोपडपट्टीतला अंबादास जाणार जपानला