आता घरीच करा हुरडा पार्टी, पुण्यात मिळतेय होम डिलिव्हरी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठवाड्यातील तरुणांनी एकत्र येऊन 'हुरडा पार्टी' नावाने नवीनच व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
1/7

हिवाळा सुरू झाला की हुरडा पार्टी आठवते. थंडीत कुटुंब अथवा मित्रांसोबत हुरडा पार्टी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण हुरडा पार्टी करण्यासाठी आता हॉटेल किंवा शेतात जाण्याची गरज नाही. कारण आता <a href="https://news18marathi.com/pune/">पुणेकरांना</a> घरबसल्यादेखील हुरडा उपलब्ध होणार आहे.
advertisement
2/7
मराठवाड्यातील तरुणांनी एकत्र येऊन 'हुरडा पार्टी' नावाने नवीनच व्यवसाय सुरू केला आहे. ते ऑर्डरप्रमाणे पुण्यात होम डिलिव्हरी करत आहेत. त्यामुळे हुरडाप्रेमींना घरबसल्या हुरडा मिळतोय, तर या माध्यमातून तरुणांना व्यवसायही उपलब्ध होत आहे.
advertisement
3/7
अमित मरकड, राहुल जाधव, श्रीकांत जाधव, श्रीकृष्ण थेटे हे चौघे मिळून हा व्यवसाय करीत आहेत. ते थंडीच्या हंगामात मराठवाड्यातून हुरडा आणून पुणे शहरात ऑनलाईन डिलिव्हरीबरोबरच स्टॉलवर विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे हुरडाप्रेमींना आता घरातल्या घरातच हुरडा पार्टी करता येत आहे.
advertisement
4/7
ग्रामीण भागातील जुन्या लोकांच्या आवडत्या हुरड्याची चव सध्या शहरातील नव्या पिढीलाही चाखायला मिळत आहे. सध्या हुरड्याला ऑनलाईन मागणी वाढत असल्याने तरुणांना या व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे हुरडा व्यावसायिक अमित मरकड यांनी सांगितले.
advertisement
5/7
पुण्यातील बाजारात पुणे ग्रामीणमधून तसेच अहमदनगर आणि औरंगाबाद येथून रोज 500 ते 600 किलोची आवक होत आहे. त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला 300 ते 350 रुपये, किरकोळमध्ये 450 रुपये किलो, तर 100 ग्रॅमची प्लेट 50 रुपयांना खपत आहे. घरगुती ग्राहकांसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटनस्थळी खाद्यपदार्थाची विक्री करणारे हुरडा विक्री करत आहेत.
advertisement
6/7
ग्रामीण भागात पारंपरिक हुरडा शेतात जाऊन खाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामध्ये जुन्या मंडळींना हुरडा थंडीच्या दिवसात खाण्यास आवडतो. मात्र, नवीन पिढीला समजावा म्हणून तीन-चार तरुणांनी एकत्र येऊन नवीन कल्पना मांडत 'मराठवाडा हुरडा कंपनी' तयार केली आहे. कोरोनाच्या काळापासून हा ऑनलाइन व्यवसाय सुरु केला. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
7/7
माझे पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण झाले असून एका पब्लिकेशनमध्ये नोकरी करीत आहे. थंडीच्या दिवसात हा हंगामी व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये वर्षाला तीन लाख उत्पन्न मिळत आहे. कोरोनाच्या काळात हा व्यवसाय सुरु केला असून मागणी चांगली असल्याचे अमित मरकड याने सांगितले.