TRENDING:

हैदराबादच्या 13.5 कोटींच्या खेळाडूवर 2 वर्षांची बंदी! BCCI च्या कारवाईनंतर PSL ने लगेच दिली एन्ट्री! पाहा कोण?

Last Updated:
PSL 2026 Islamabad United signed Harry Brook : यंदाच्या हंगामात इंग्लंडच्या कॅप्टनवर आयपीएलकडून कारवाई झाली होती. अशातच हॅरी ब्रुक थेट पाकिस्तानच्या लीगमध्ये सामील झाला आहे.
advertisement
1/7
हैदराबादच्या 13.5 कोटींच्या खेळाडूवर 2 वर्षांची बंदी! BCCI च्या कारवाईनंतर PSL ने लगेच दिली एन्ट्री! पाहा कोण?
बीसीसीआयसाठी आयपीएल सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरली अन् शेजारच्या पाकिस्तानच्या तोंडाला देखील पाणी सुटलं. आयपीएल प्रसिद्धीस आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटने देखील क्रिकेट लीगला सुरवात केली.
advertisement
2/7
पाकिस्तान सुपर लीग सुरू झाली खरी पण प्रसिद्धी काही मिळाली नाही. याच लीगमध्ये पीसीबीच्या खिशाला मोठा कात्री बसली. आता कुठं गोष्टी सुरळीत होत नाही तोपर्यंत पीएसएलमधून वाद समोर येऊ लागलेत.
advertisement
3/7
कधी बॉल टेम्परिंग तर कधी भांडणं यामुळे पीएसएल बदनाम झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता पाकिस्तान क्रिकेटने आयपीएलचे खेळाडू पळवण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआयच्या एका नियमाचा त्यांना फायदा झालाय.
advertisement
4/7
बीसीसीआयने परदेशी खेळाडूंनी फक्त पैशासाठी आयपीएल खेळू नये, यासाठी नियम काढला होता. त्यानुसार नोंदणी करून आयपीएल न खेळणाऱ्या खेळाडूंवर दोन वर्षांचा बॅन लावण्यात आला होता.
advertisement
5/7
इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक याच्यावर आयपीएलमधून बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता हॅरी ब्रुकला पाकिस्तानने जवळ केलं असून त्याला पीएसएल खेळण्यासाठी थेट एन्ट्री दिलीये.
advertisement
6/7
हॅरी ब्रूकसाठी पीएसएलमधील एन्ट्री अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तो कराची लेगपासून इस्लामाबाद युनायटेडच्या ताफ्यात सामील होईल. ब्रूकच्या एन्ट्रीने त्यांची बॅटिंग लाईनअप आता अधिक मजबूत झाली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, हॅरी ब्रूकवर 2026 आणि 2027 या दोन सीजनसाठी बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता तो दोन सीझन पाकिस्तानमध्ये खेळेल अन् नंतर आयपीएलमध्ये येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
हैदराबादच्या 13.5 कोटींच्या खेळाडूवर 2 वर्षांची बंदी! BCCI च्या कारवाईनंतर PSL ने लगेच दिली एन्ट्री! पाहा कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल